NC Times

NC Times

दुध दर वाढीसाठी शिवसेना (उबाठा) आक्रमक,आंदोलनाच्या पावित्र्यात,तहसीलदारांना निवेदन


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- दुधाला योग्य दर मिळत नसल्याने,दुध उत्पादक शेतकरी हा पुरता कोलमडून गेला आहे.त्यामुळे योग्य दुध दर वाढ न झाल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा खणखणीत इशारा शिवसेना गुंठेवारी विकास समितीचे तालुका अध्यक्ष रामदास सावंत व पदाधिकारीयांनी दिला असून,तश्या आशयाचे निवेदनही तहसीलदार अर्चना कापसे यांना देण्यात आले आहे.
 निवेदनात असे म्हणण्यात आले आहे की सध्या पशुखाद्याचे दर हे दिवसेंदिवस गगनाला भिडत असुन दुधाचे दर मात्र आत येत आहेत.त्यामुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांना खर्चाचा मेळ घालणे मात्र जिकिरीचे झाले आहे. 
      त्यामुळे गायीच्या दुधाला ३.५ फॅटला व ८.५ एसएनएफ ला ४०/- रुपये तर म्हशीच्या दुधाला ६.० फॅटला व ९ एसएनएफ ६०/-  रुपये प्रमाणे दर हा मिळालाच पाहिजे.त्याचबरोबर अन्न व औषध प्रशासनाने दुध भेसळ रोखण्यासाठी आज अखेर कीती कारवाई केली याचा अहवाल प्रसिद्ध करावा असेही या निवेदनात म्हणटले आहे.सदर मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना (उबाठा) आपल्या स्टाईलने तीव्र आंदोलन करेल असा इशाराही देण्यात आला आहे. 
 यावेळी शिवसेना गुंठेवारी विकास समितेचे तालुका अध्यक्ष रामदास सावंत,शिवसेना तालुका उपप्रमुख दिलीप गिड्डे,गणेश चव्हाण,गुंठेवारी विकास समितीचे तालुका उपप्रमुख दिलीप गावडे,शिवशक्ती वाहतूक सेनेचे अजय मोरेसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.