NC Times

NC Times

भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या बैठकी आधी महाराष्ट्रात मध्यरात्री राजकीय घडामोडीवर चर्चा


नवचैतन्य टाईम्स मुंबई प्रतिनिधी(एस.डी.कदम)-  लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्याच विधानसभा निवडणुकीचे वारे वाहु लागले आहे. बैठका, मतदारसंघात चाचपणी, जागावाटप, दावे-प्रतिदावे हे सर्व सुरू असतानाच लोकसभा निवडणुकीत बसलेला फटका भरून काढण्यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत. आज महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची राजधानी दिल्लीत बैठक पार पडणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील काही महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीआधी महाराष्ट्रात मध्यरात्री राजकीय खलबतं दिसून आली.
 काल(सोमवारी) मध्यरात्री वर्षा बंगल्यावर दीड तास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बंद दाराआड महत्त्वपूर्ण चर्चा झाली. संभाव्य जागांची यादी घेऊन आज देवेंद्र फडणवीस केंद्रातील नेत्यांना भेटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. देशातील ज्या-ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत, त्या राज्यांच्या भाजपच्या नेत्यांची आज केंद्रात महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे.
 दरम्यान, मध्यरात्री वर्षा बंगल्यावर मंत्रीमंडळ विस्तार आणि आगामी विधानसभा निवडणूकीबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळ विस्तार करण्याचा महायुतीचा मानस असल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुका लक्षा घेता, महाविकास आघाडीपाठोपाठ महायुतीतील मित्र पक्षांसोबत मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती पत्रकाराशी माहिती  दिली आहे.
 आज दिल्लीत होणाऱ्या बैठकीत आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तर लोकसभा निवडणुकीतील राज्यातील अपयशानंतर दिल्लीत होत असलेल्या बैठकीला महत्व प्राप्त झाले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपची पिछेहाट, राज्यातील महायुतीला मिळालेल्या कमी जागा यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.        विधानसभा निवडणुकीची रणनीती आणि संभाव्य जागावाटप यावर देखील बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या राजीनाम्याच्या घोषणेवर देखील बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीसाठी राज्यातील महत्त्वाचे नेते उपस्थित असणार आहेत.
बैठकीला उपस्थित राहणारे नेते
देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे,रावसाहेब दानवे ,चंद्रकांत पाटील,आशिष शेलार,विनोद तावडे,सुधीर     मुनगंटीवार,