NC Times

NC Times

नजर टाकताच हरणानं थेट डाव टाकला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी? "म्हणून कुणालाच कमी समजू नका"


 सोशल मीडियावर एक अतिशय धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. शिकारी पक्षातील सर्वच पक्ष्यांची दृष्टी अतिशय तीक्ष्ण असून गरूड हा पक्ष्यांचा राजा एक ते दीड मैलावरची शिकार पाहू शकतो. सर्व पक्ष्यांमध्ये गरुड हा सर्वात धोकादायक आणि शक्तिशाली शिकारी आहे. असं म्हणतात की, त्याच्या पंखात एवढी शक्ती असते की तो सर्वात मोठी शिकारही सहज उचलू शकतो आणि आकाशात उडू शकतो. गरुड त्याच्या मजबूत पंखांच्या जोरावर कोणत्याही आणि मोठ्या प्राण्याची सहज शिकार करु शकतो. हरणाची शिकार करून गरुड आकाशात उडताना तुम्ही कधी पाहिले आहे का?
सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हरणाची शिकार केल्यानंतर गरुड आकाशात उडताना दिसत आहे. हरीणही किती चपळ आहे याचा अंदाज आपल्याला आहे मात्र हरणाची चपळताही गरुडाच्या ताकदीपुढे फेल गेली. सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे कोणालाच कमी समजू नका, कधी डाव उलटेल हे सांगू शकत नाही.
शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
गरुडची झेप पाहून अंगावर काटा येतो. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक गरुड आपल्या पंजामध्ये चपळ अशा हरणाला घेऊन उंच आकाशात झेप घेत आहे. जमीनीवर असणारं हरीण कितीही शक्तीशाली प्राणी असुद्यात मात्र त्याला चकवा देऊन पसार होतोच. हरीण किती चपळ प्राणी आहे हे आपल्याला माहितीच आहे, मात्र गरुडाच्या ताकदीलाही विसरुन चालणार नाही. अशा चपळ हरणाची गरुडानं संधी साधत शिकार केली आणि त्याला पकडून उंच आकाशात झेप घेतली.                                             पहा पुढील लिंकवर  व्हिडीओ
https://x.com/AMAZlNGNATURE/status/1801323906868924606?t=Tn26nrDIFuCqJPH_lq9Y1g&s=08
हा व्हिडिओ सोशल मीडियावर @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. त्यासोबत कॅप्शन आहे – गरुड हरण घेऊन जात आहे. या व्हिडिओला शेअर केल्यापासून १९.५ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. यावर युजर्स कमेंटही करत आहेत, एका यूजरने लिहिले… “एखाद्याने शत्रूला कधीही हलके समजू नये.” दुसऱ्या युजरने लिहिले…”गरीब गरुड, आज त्याचे नशीब चांगले होते. तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले… गरुडाची ताकद माहिती असताना हरणाने त्याला हलक्यात घेतलं असेल असं दिसत आहे.”