NC Times

NC Times

शेळकेवाडीच्या प्रमिला जगतापचा डब्बल धमाका,पाणीपुरवठा अभियंतासह कॅनाॅल इन्स्पेक्टरपदी निवड


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)- :- महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या सरळसेवा भरती परिक्षेद्वारे शेळकेवाडी (ता कवठेमहांकाळ) येथील अगदी सामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थीनीं कु प्रमिला रामदास जगताप हिची पाणीपुरवठा अभियंता नगरपरिषद व कॅनॉल इन्स्पेक्टर जलसंपदा विभाग या दुहेरी पदावर निवड झाली असून, तिच्या या यशाचे परिसरातून मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे.
कु प्रमिला जगताप ही अगदी सामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थीनीं असुन,तिने हे यश पहिल्याच प्रयत्नात मिळविले आहे.तिचे प्राथमिक शिक्षण हे शेळकेवाडी जिप शाळेत तर माध्यमिक शिक्षण हे आगळगाव हायस्कूल मध्ये झाले.तर मिरज येथील गव्हर्नमेंट पॉलीटेक्निक काॅलेज मध्ये तिने डिप्लोमा केला तर पुढे आष्टा (ता वाळवा) येथील आण्णासाहेब डांगे इंजिनिअरिंग काॅलेज मध्ये तिने इंजिनिअरची पदवी मिळवली.त्यानंतर तिने चरापले अभ्यासिका इस्लामपूर व सरस्वती अभ्यासिका सांगली येथे मार्गदर्शन घेऊन परिक्षेद्वारे हे मोठे यश मिळविले.
 तिच्या या यशाचे आमदार श्रीमती सुमनताई पाटील,जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती दत्ताजीराव पाटील कुटुंबीय,शेळकेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ सुनिता साळुंखे यांनी,सिध्देश्वर ग्राम विकास सोसायटीचे चेअरमन विठ्ठल माने,पोलिस पाटील सौ सविता चव्हाण कुटुंबीयांच्या वतीने त्याचबरोबर शेळकेवाडी जिल्हा परिषद शाळा तसेच विविध शिक्षक संघटना,महिला मंडळाच्या वतीने प्रत्येक्ष भेटून तिचा यथोचित सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्काराला उत्तर देताना कु प्रमिला जगताप म्हणाली की जिद्द,चिकाटी व अभ्यास करण्याची सचोटी आसल्यास जीवनात कोणतेही यश दुर नसल्याचे सांगुन,आपणा कडून होत असलेल्या यथोचित सत्कारांने मी पुर्णतः भारावून गेले असल्याचे सांगून माझ्या या यशात शिक्षक व पालक यांचा सिंहाचा वाटा असल्याचेही तिने यावेळी स्पष्ट केले.