NC Times

NC Times

खानापूर तालुका भाजप उपाध्यक्षांच्या घर आणि गाडीवर दगडफेक


नवचैतन्य टाईम्स माडग्याळ/ वार्ताहर(विजय चौगुले)- 
भाजपाच्या खानापूर तालुका उपाध्यक्षांच्या घरावर आणि गाडीवर मंगळवारी मध्यरात्री अज्ञातांनी दगडफेक केली . ही घटना देविखिंडी येथे घटली . यात गाडीच्या काचा फोडुन पंधरा हजाराहून अधिक रूपायांचे नुकसान झाले.याबाबत विटा पोलिस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की , खानापूर तालुक्यातील देविखिडी येथे भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष दिलीप दत्त पाटील यांचे घर आहे . त्या समोरच चार चाकी गाडी पार्किंग  करण्यासाठीचे पत्र्याचे शेड आहे . काल मंगळवारी मध्यरात्री नंतर दिलीप पाटील यांच्या घरावर आणि घरासमोर असलेल्या गाडीवर पाठीमागून अनोळखी लोकांनी दगड मारून काच आणि घराच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या असुन यात पंधरा  हजारचे नुकसान झाले आहे .याबाबत दिलीप पाटील यांनी विटा पोलिसांत अज्ञातांविरोधात फिर्याद दिली आहे .