NC Times

NC Times

खते आणि बियाण्याची जादा दराने विक्री करणाऱ्या दुकानदारावर गुन्हे दाखल करा- मा.सुनिल बागडे तालुकाध्यक्ष प्रहार संघटना


नवचैतन्य टाईम्स जत (प्रतिनिधी)- पावसाळा सुरू झाल्यात जमा आहे. त्यामुळे शेतकरी बि- बियाणे व खते खरेदी करण्यासाठी धाव घेत आहेत. जिल्ह्यात नव्हे तर जत तालुक्यात चढ्या भावाने बी- बियाणे आणि खते विक्री सर्रास चालू आहे. मात्र कृषी विभागाचे अधिकारी झोपलेले आहेत. याबाबत जिल्हा प्रशासन कसलीही दखल घेत नाही. उन्हाळ्यातील पाणी आणि चारा टंचाई मुळे शेतकरी अगोदर त्रस्त असल्याने चढ्या भावाने होणारी विक्री रोखण्यासाठी कृषी खात्याचे अधिकारी पुढे आले नाहीत, तर त्यांच्या दारात आंदोलन करू, असा इशारा प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल बागडे यांनी दिला आहे. 
राज्याच्या कृषी विभागात देखील प्रचंड अनागोंदी माजली असून राज्य शासन याकडे लक्ष देत नाही. भ्रष्ट प्रशासनाने शेतकरी सध्या हातबल आहे. गेल्या काही वर्षात शेतीने शेतकऱ्याला म्हणावी अशी साथ दिली नाही. त्यामुळे चढ्या भावाने होणारी विक्री शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. त्याशिवाय बोगस बियाणे विकले जाण्याची देखील शक्यता आहे. कृषी खात्याने याकडे देखील लक्ष देण्याची आवश्यकता आहे. जून महिना हा राज्याच्या कृषी विभागाचा सुगीचा काळ असतो. या काळात कृषी विभाग शेतकऱ्यांच्या समस्या कडे पाहत नसते. मात्र जिल्हा प्रशासनाने आता चढ्या होणारी विक्री रोखण्यासाठी पुढे यावे. अन्यथा कृषी अधिकाऱ्याच्या दारात आम्हाला आंदोलन करावे लागेल, असा इशारा बागडे यांनी दिला आहे.