NC Times

NC Times

मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बंगल्यावर महायुती मित्र पक्षांची बैठक संपन्न


नवचैतन्य टाईम्स मुंबई (प्रतिनिधी)-
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पदाचा राजीनामा देऊ नये व विधानसभा निवडणुकीची तयारी करावी सर्व लहान मोठे मित्र पक्ष त्यांच्या बरोबर आहेत असा ठराव मंजूर करण्यात आला निवडणुकीच्या तयारीला लागायचे ठरले आहे.महाराष्ट्रात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती 200 च्या जागेवर घवघवीत यश प्राप्त करुन एक हाती सत्ता आणु असा विश्वास या वेळेस राष्ट्रीय स्वराज्य सेना राजकीय पक्षांचे अध्यक्ष श्रीहरी बागल यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय स्वराज्य सेना हा मराठा राजकीय पक्ष असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात स्वराज्य दौरा चालू करून तालुका निहाय मेळावे घेणार आहे.मराठा समाजाचे झालेले अनेक गैरसमज दुर करुन भारतीय जनता पार्टी ने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देऊन माझ्या समाजाचे होणार नुकसान थांबवले आहे हे व असे अनेक विषय घेऊन लोका समोर जाणार आहे व सकळ मराठा समाज परत एकदा महायुतीचा पाठीशी भक्कम पणे उभा राहुन देशाचा विकासाला हातभार लावेल असे आपले मत व्यक्त केले आहे. या स्वराज्य दौरा चालु असताना घटना दुरुस्ती बदल झालेला अपप्रचार दुर करण्यासाठी प्रयत्न करणार आहे तसेच मराठा आरक्षणावर झालेला फसवा ,खोटी माहिती पसरवली आहे तीही दुर करून सत्य व खरी परिस्थिती लोकसमोर आणणार आहे तसेच लवकरच महायुतीचे मित्र पक्ष वाय बी चव्हाण येथे एकत्रित मेळावा ही घेणार आहे असे ठरले आहे.या वेळेस माजीमंत्री सदाभाऊ खोत, कवाडे गटाचे जयदीप कवाडे राष्ट्रीय समाज पक्षाचे विठ्ठल यमकर , अनिल कांबळे साहेब व इतर प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने   उपस्थित होते.
- ॲड. श्रीहरी बागल
राष्ट्रीय अध्यक्ष-राष्ट्रीय स्वराज्य सेना (राजकिय पक्ष)  भाजपा महायुती चा घटक पक्ष. -9820305909