NC Times

NC Times

बहिणीसोबत गद्दारी? विजयासाठी धनंजय मुंडेंची मदत बजरंग सोनवणेंचा गौप्यस्फोट, वाद उफाळणार?


नवचैतन्य टाईम्स माजलगाव प्रतिनिधी(सुग्रीव कदम)-लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का सहन करावा लागला. येथून शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या बजरंग सोनवणे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला. राज्यात सर्वात अखेरचा निकाल हा बीडचा लागला. निकालाच्या दिवसभर बीडमध्ये दोन्ही उमेदवारांमध्ये चुरस दिसून आली. पण, अखेर बजरंग सोनवणे यांचा विजय झाला. त्यानंतर अजूनही यावरील चर्चा सुरुच आहेत. यात आता विजयी सोनवणे यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. त्याने नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
मला विजय मिळवून देण्यात  बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांचा वाटा असल्याचं बजरंग सोनवणे म्हणाले आहेत. त्यामुळे बीडच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे.
बीड लोकसभेमध्ये विजयी झालेले उमेदवार तथा बीड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी निवडून आल्याबद्दल राज्याचे कृषिमंत्री तथा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचे बंधू धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर भाजपचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार सुरेश धस यांचे देखील त्यांनी आभार मानले आहेत. धस हे आष्टी मतदार संघातून ७०,००० हजार मतांची लीड भाजपला देणार होते. मात्र, त्यांनी ३२००० दिले, असं म्हणत बजरंग सोनवणे यांनी आभार मानले आहेत.
 सोनवणे यांच्या या वक्तव्याने आता नवा वाद उद्भवू शकतो. धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंसाठी प्रचार केला होता. पण आता सोनवणे यांच्या या विधानाने पुन्हा एकदा भाऊ-बहिणीत फूट पडण्याची शक्यता आहे.