NC Times

NC Times

मंडी जिंकल्यानंतर कंगना रणौतची पहिली प्रतिक्रिया 'हा विजय मोदींचा अन् सनातनचा...'


नवचैतन्य टाईम्स  मुंबई( प्रतिनिधी(नेहाल हसन)- अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) हिमाचल प्रदेशमधील 'मंडी लोकसभा मतदारसंघा'मधून निवडणूक जिंकली आहे. अभिनेत्रीने पहिल्याच प्रयत्नात काँग्रेस उमेदवाराला धुळ चारली. ४ जून रोजी मतमोजणी सुरू झाल्यापासूनच ती पहिल्या फेरीपासूनच मताधिक्य राखून होती. अभिनेत्रीने काँग्रेसच्या विक्रमादित्यसिंह यांचा पराभव केला आहे. २४ मार्च रोजी भाजपने कंगनाला तिच्याच मातीत घरच्या मातीत अर्थात मंडी लोकसभा मतदारसंघातून संधी दिली आणि ४ जून रोजी तिने या संधीचं सोनं केल्याचं स्पष्ट झालं आहे. या विजयानंतर कंगनाने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत मंडीवासियांचे आभार मानले.
कंगनाने मंडीतील जनतेचे मानले आभार
कंगना रणौतने मंडीतील जनतेचे आभार व्यक्त करणारे एक पोस्टर शेअर केले. तिने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये अभिनेत्रीने कमळाचे निशाण असणारी एक हिमाचल प्रदेशची पारंपरिक टोपी परिधान केली आहे, शिवाय तिने हात जोडून पोज दिली आहे. गेल्या काही महिन्यात अभिनेत्रीने मंडीवासिंयांच्या भेटीगाठी घेतल्या, त्यादरम्यानचे काही क्षणही या पोस्टवर आहेत. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचाही फोटो या पोस्टरवर आहे. अभिनेत्रीने पोस्टरवर लिहिले आहे की, 'मंडीतील माझ्या सर्व कुटुंबीयांचे मनापासून आभार'.
अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर पोस्टर शेअर करताना असे कॅप्शन दिले आहे की, 'हा पाठिंबा, प्रेम आणि विश्वासाबद्दल मंडीतील सर्व जनतेचे मनःपूर्वक आभार. हा तुम्हा सर्वांचा विजय आहे, हा पंतप्रधान मोदीजी आणि भाजपवरील विश्वासाचा विजय आहे, हा सनातनचा विजय आहे, हा मंडीच्या सन्मानाचा विजय आहे.' कंगनाने शेअर केलेल्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे, शिवाय तिच्याकडून या मतदारसंघामध्ये चांगल्या कामाची अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
 कंगनासाठी मंडी जिंकणं आहे मोठा विजय
कंगनासाठी हा विजय मोठा आहे कारण पहिल्यांदाच निवडणूक लढवत असूनसुद्धा तिने तब्बल ७२०७७ मतांनी विक्रमादित्यसिंह यांचा परावभव केला. मंडीतील स्थानिक कुटुंबाला हरवत तिने या मतदारसंघात विजय मिळवीला.