NC Times

NC Times

पॅंथर स्वप्निल जावळे यांनी वडूज येथील पिडित कुटुंबियांची घेतली भेट


नवचैतन्य टाईम्स सातारा प्रतिनिधी(दिनेश लोंढे)-
दलित पॅंथर चे खंडाळा तालुका अध्यक्ष स्वप्निल जावळे यांनी वडूज मायनीचे सीताबाई शेडगे, बाळू शेडगे या पिडीत कुटुंबाची भेट घेतली. जमिनीच्या वादातून गावगुंडांनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून व त्यांना जिवे मारण्याचे धमकी दिली असताना ते पिडित कुटुंब पोलीस प्रशासनाकडे तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांची दखल घेतली नाही. हा प्रकार जेव्हा पॅथर स्वप्निल जावळे यांना समजताच ते स्वतः त्या पीडित कुटुंबाला भेटून त्यांनी सर्व प्रकार सांगितल्यावर वडूज मायनी चे पोलिस निरीक्षक घनःश्याम सोनवने यांना त्याच क्षणी फोन करून या पीडित कुटुंबाला न्याय मिळावा व त्या गावगुंडा विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना तत्काळ अटक करावी असे सांगून या सर्व शेडगे कुटुंबाला न्याय मिळवून दिला. तसेच ज्या ज्या वेळी गरीब कष्टकरी शेतकरी मजूर वर्गावर अन्याय होईल त्यावेळी पॅंथर म्हणून लोकांच्या पाठीशी सदैव उभा राहून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे असा शब्द पॅथर स्वप्निल जावळे यांनी दिला यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.