NC Times

NC Times

"भारत देशाचा ज्वलंत इतिहास आणि उज्वल भविष्याचा समतोल राखावा"...


नवचैतन्य टाईम्स अमोल मांढरे वाई.८ जून-
जगाच्या पाठीवरील एक खंबीर नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या भारत देशाला एक ज्वलंत इतिहास आहे.
 त्याचा आदर्श आपल्यालाच काय पण पूर्ण जगाला हेवा वाटेल असाच आहे.आपल्या भारतीय संस्कृतीला शेकडो वर्षांची समृद्ध परंपरा आहे. आपली भारतीय संस्कृती ही फार पूर्वीपासूनच जगाच्या पाठीवरील एक सुवर्णभूमी म्हणून ओळखली जाते. आपल्या भारत देशातून सोन्याचा धूर निघायचा म्हणे. ही आख्यायिका सर्व जगात पसरलेली होती. जगाच्या पाठीवर कुठेही आपल्या भारत देशासारखा ज्वलंत इतिहास नाहीच. यात तीळ मात्र शंका नसावी. आणि वाढत्या पाश्चिमात्य संस्कृतीत तितक्याच ताकदीने आजचा आपला भारत देशाचा वर्तमान आणि भविष्याकडे खंबीर नेतृत्व निर्माण करणाऱ्या आपली युवाशक्ती हे आपले आधारस्तंभ आहे. विविध धर्म ,जाती, पंथ त्याचबरोबर विविध भाषा, संस्कृती अशा विविध नटलेल्या भारतीय संस्कृतीचा वारसा जोपासणे हे आजच्या युवक वर्गाचे आद्य कर्तव्यच आहे. याच आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणजे विविध जाती, धर्माच्या या आपल्या लोकांनी नेहमी एकत्रितपणे आणि शांततेने राहून आपली ओळख सर्व जगामध्ये एक आदर्श अशीच निर्माण केलेली आहे. आज मला व्यक्ती शहा आपल्या युवकांशी संवाद साधताना अभिमान वाटत आपल्या भारत देशावर पूर्वीपासूनच अनेक परकीय आक्रमणे इंग्रज डच फ्रेंच पोर्तुगाल मुघल यांसारख्या जुलमी राजवटीने त्यांची संस्कृती आपल्या आदर्श भारतीय संस्कृतीवर लादण्याचे अनेक प्रयत्न केले परंतु त्यात त्यांना काडी मात्र यश मिळाले कारण तेव्हाच्या स्वातंत्र्य सैनिकांनी आणि सामान्य जनतेनेही त्यांना हे शक्य करून दिले आपल्या युवकांनी हाच आपल्या ज्वलंत इतिहासाचा अभिमान जागृत करून भविष्यातही भारतीय संस्कृती जगाच्या पाठीवरील सर्वांना आपुलकी आणि आनंद देईल याची दक्षता घ्यावी. आणि हेच आपल्या युवकांचे आद्य कर्तव्यच आहे.याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमानच असायला हवा. अगदी प्राचीन काळात आपल्या देशात रामराज्य होते अशी आख्यायिका  आजही आपण ऐकत आहोत. आजही आपल्या घरातील वरिष्ठ व्यक्ती लहान मुलांना रामराज्याचा आदर्श अगदी अभिमानाने सांगतात. आजही लग्नकार्यामध्ये राम सीताच्या जोडीचा आदर्श ची परंपरा आजही जोपासली आहे. त्याचबरोबर आजही आपल्या देशात नियमितपणे रामायण व महाभारत या पवित्र ग्रंथांचे अध्ययन केले जाते. आजही आपल्या घरातील अनेकांची नावे ही याच ग्रंथांच्या व्यक्तिरेखेतून ठेवलेली आहेत. आजच्या  युवक वर्गाने एक लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे याच आपल्या आदर्श भारतीय संस्कृतीमुळे आपली जगात ताठ मानेने उभे राहण्याची परंपरा आहे. आणि याच आपल्या आदर्श भारतीय संस्कृतीत आपला जन्म झाल्याचा अभिमान प्रत्येकाला असायलाच हवा. आपल्या याच वैभव संपन्न अशी ओळख झालेल्या देशावर अनेक परकीय आक्रमण झाली. परंतु अहिंसा आणि सहिष्णुता याचा आपल्या आदर्श गुणांमुळेच कदाचित यास तीव्र विरोध झाला नसेल. तेव्हा आपल्या देशावर मुघलांचे जुलमी राजवट होती. सामान्य रयतेवर अनेक जुलूम व अन्याय होत होते. तेव्हा याच आपल्या प्रजेला सावरण्यासाठी कोणी वाली नव्हता. तेव्हा याच आपल्या महाराष्ट्राच्या पवित्र मातीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. हजारो  रात्री नंतर एक पवित्र आणि तेजस्वी सूर्योदय व्हावा अशी ती वेळ होती. लहानपणापासूनच शिवाजी महाराज हे आपल्या प्रजेची बिकट अवस्था उघड्या डोळ्यांनी पाहत होते. तेव्हा वडील शहाजीराजे व मातोश्री जिजाऊ यांनी त्यांच्यावर उत्तम संस्कार केले. त्याचबरोबर आपली आदर्श भारतीय संस्कृती,पवित्र ग्रंथांचे पठण त्यांच्या मनावर बिंबविले. व याच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे आपल्याच समाजातील निधड्या छातीच्या मावळ्यांना एकत्र करून परकीय आक्रमणास तीव्र विरोध केला. आणि सरते शेवटी आपले आदर्श स्वराज्य निर्माण केले आणि विशेष म्हणजे त्यावेळी त्यांनी वापरलेल्या आदर्श राजनीती आणि गनिमी काव्याचा अभ्यास आज जगातील बदल देशही करत आहेत. तेव्हा आज आपलेच समाजातील युवकांनी याचा आपल्या याच आदर्श स्वराज्याचा वारसा जोपासणे गरजेचे आहे. आज वाढत्या शहरीकरणात आपले युवक वर्ग हे आपल्या भारतीय संस्कृतीला विसरून पाश्चिमात्य देशाच्या संस्कृतीला बळी पडत आहेत. तेव्हा ही गंभीर बाब लक्षात घेऊन युवकांनी वेळीच सावरून आपल्या संस्कृतीचा अभ्यास करावा. आपल्याला असणाऱ्या महापुरुषांच्या आदर्श चरित्राचा अभ्यास, विविध ग्रंथांचे पठण त्याचबरोबर संतांची महती लक्षात घेऊन आपल्या आई-वडिलांबरोबर गुरुजनांचाही अभिमान बाळगावा. आपल्याला पूर्वीपासूनच ज्या शैक्षणिक संस्थांचा आदर्श होता तो आजही आहे. आपले आजचे यशस्वी व बुद्धिमान विद्यार्थी परदेशात स्थलांतरित करीत आहेत. परंतु याच विद्यार्थ्यांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता आपल्या देशातच राहून येथे संशोधन करून आपल्या देशाचा अभिमान बाळगावा. आणि विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जे विद्यार्थी परक्या देशात जात आहेत तेच देश आपल्या भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी आतुरलेले आहेत. तेव्हा शासनाने ही आपल्या शैक्षणिक क्षेत्रातून आपल्या आदर्श भारतीय संस्कृतीचा अभ्यास विद्यार्थ्यांना अवगत करावा. त्याचबरोबर याच आपल्या बुद्धिमान विद्यार्थ्यांच्या प्राविण्याला योग्य तो मान देऊन त्यांच्या कलेचा आदर राखावा. आणि हे आपल्या देशासाठी एक सकारात्मक पाऊल ठरेल. आपले भारतीय संस्कृतीमध्ये अनेक थोर महापुरुषांचा आदर्श लाभलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, त्याचबरोबर स्वामी विवेकानंद, पृथ्वीराज चव्हाण, झाशीची राणी मातोश्री जिजाऊ,यांसारख्या महापुरुषांनी खरोखरच आपल्या थोर विचारांनी आणि कार्याने आपल्या युवकांसमोरच एक थोर आदर्श ठेवलेला आहे. तेव्हा युवकांनीही त्यांच्या चरित्र चा अभ्यास करून स्वतःचे व्यक्तिमत्व घडवावे. आपल्या भारतीय संस्कृतीने एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण कधीही कुठल्या देशावर आक्रमण केले नाही. किंवा आपल्या देशाच्या साम्राज्यविस्ताराचा कुठलाही वाईट विचार कधीच आला नाही. परंतु आपल्या इतिहासात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखीच आहे की आपण जरी अहिंसाचे वैचारिक आहोत, तरीही आपल्या भारत मातेकडे कोणी वाईट नजरेने पाऊल टाकले तर त्यास ताबडतोब विरोध करून त्यांचा बिमोड करायची ताकद आपल्याकडे आहे हे आपल्या इतिहासाने सर्व जगाला नेहमीच सांगितले आहे.  आपल्या वीर जवानांनी हेच लक्षात घेऊन आपल्या शत्रुराष्ट्रासही चांगला जरब बसेल याचा विचार करावा. आज आपण कोरोनाच्या संकटातून सावरलेले आहोत. परंतु काही दिवसांपूर्वीच्या या जागतिक संकटामध्ये आपल्या भारत देशाने एक विश्वगुरू म्हणून जगात ओळख निर्माण केलेली आहे.  या संकटकाळात आपल्या भारत देशाने सर्व जगाला मदत केलेली आहे आज आपल्या भारत देशावर शेजारील काही शत्रुराष्ट्र हे वाकड्या नजरेने बघत आणि त्यास आपले भारतीय वीर जवान त्यांच्याच भाषेत सडेतोड उत्तर देत आहेत.तेव्हा देशांतर्गत पोलीस यंत्रणा व सीमेवर वीर जवान आपल्या प्राणाची बाजी लावून आपले कर्तव्य पार पाडत आहेत.तेव्हा आपण सर्व नागरिकांनीही त्यांच्याबद्दल अभिमान बाळगावा व आपले कर्तव्य ही पार पाडावे.त्याचबरोबर आपला अन्नदाता असलेला आपल्या बळीराजाही सध्या संकटात सापडलेला आहे. बळीराजा हा कधी नापीक, दुष्काळ, ओला दुष्काळ या आसमानी संकटामुळे आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतआहे. तेव्हा शासनाबरोबरच आपल्या सर्वसामान्य नागरिकांनी ही या आपल्या बळीराजास धीर द्यावा व त्यास परिपूर्ण मदत करावी. आपल्या भारतीयांचे एक अलौकिक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या समाजात असलेली विभिनता, अशिक्षित आणि उच्चशिक्षित वर्ग असो अथवा गरीब आणिश्रीमंती वर्ग स्त्री अथवा पुरुष आणि ग्रामीण व शहरी असा कोणताही भेदभाव न मानता परस्परात सुसंवाद आणि गुण्या गोविंदाने राहून आपली जीवन व्यतीत करीत आहोत. तेव्हा फक्त याच आपल्या समाजातील कुटुंबाला दुसऱ्या परकीय आक्रमणाची परत वाईट नजर न लागावी याची आपण सर्वांनी दक्षता घ्यावी.आणि सरते शेवटी एवढेच सांगायचे वाटते की आपल्या देशातील सर्वच राजकीय पक्षांनी वैचारिक व पक्षीय मतभेद बाजूला ठेवून देशाच्या संकटकाळात सर्वांनी एकत्र येऊन राष्ट्रहित हे एक मात्र उद्देश समोर ठेवून कार्यरत राहावे.तेव्हा युवकांनी आपल्या भारतीय संस्कृतीचा आदर राखावा व ती जोपासण्यासाठी आपले आद्य कर्तव्य समजून, आपले आयुष्य व्यतीत करावे. तेव्हा याच लेखाच्या शेवटी सांगावीशी वाटते की आपण सर्व पत्रकार बांधवांनी आपल्या आद्य कर्तव्य समजून आपल्या युवकांना आपल्या आदर्श भारतीय समृद्ध वारसा आपल्या लेखणीतून सांगावा. आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळख पत्रकारितेतून समाज प्रबोधन करावे. तेव्हा याच आपल्या भारतीय संस्कृतीचा आदर्श बाळगणारा मी एक कवी काही काव्यपंक्ती आपल्यासमोर मांडतो.
माझ्या वयाच्या युवकांनो तरुणांनो.
टाका तर ती पुढची पावले.
घेऊया शपथ आपल्या भारत मातेची.
नाकारू आता व्यसनांची,भ्रष्टाचाराचे प्रलोभन.
घेतली आहे मी प्रगतीची उत्तुंग झेप.
पण आजही आहे सर्व जगामध्ये.
आमच्या भारतीय संस्कृतीचा आदर.
म्हटले जाते आमच्या इथे बालकास.
भगवान श्रीकृष्णाचा अवतार.
आणि घेताना भाकरीचा घास.
केली जाते विठ्ठल नामाचे स्मरण.
आजही सांगितला जातो आमच्या येथे.
राम आणि सीतेच्या जोडीचा  आदर्श.
आणि देऊन देवी दुर्गेची उपमा.
केला जातो स्त्रीशक्तीचा सन्मान.
तेव्हा घेऊन सर्वांनी हातात हात.
करू आपली कामगिरी नेत्र दीपक.
आणि राखा युवकांनो तुम्ही आपल्या.
थोर भारतीय संस्कृतीचा आदर्श.
महान भारतीय संस्कृतीचा आदर्श..
धन्यवाद.
भारत माता की जय.
जय हिंद. जय भारत. जय महाराष्ट्र.
कविराज अमोल मांढरे. वाई.जिल्हा सातारा.
Mobile no.7709246740.