NC Times

NC Times

पुणे पोर्श कार प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवाल यांचं महाबळेश्वर येथील पंचतारांकित हॉटेल अखेर सिल


नवचैतन्य टाईम्स सातारा  प्रतिनिधी(शरद झावरे)-पुणे येथील पोर्श कार प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवाल यांचं महाबळेश्वर येथील कनेक्शन उघड झाल्यानंतर महाबळेश्वर येथे एका शासकीय मालमत्तेत भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या जागेवरती  रहिवास म्हणून मिळालेल्या परवानगी  चा वापर हा व्यवसायिक दृष्ट्या करण्यात आलेले आढळून आले. व त्या ठिकाणी, अनाधिकृतपणे मोठे बांधकाम करून त्या  वेळच्या काही शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून मोठे पंचतारांकित हॉटेल त्या जागी चालू केले गेले. 
अनेक वर्ष प्रशासनाच्या डोळ्यात धुळ फेकून अशा पद्धतीने करोडो रुपये या व्यवसायातून अग्रवाल कुटुंबियांनी कमविले.
प्रशासकीय अहवालात या सगळ्या बाबींचा ऊलगडा झाल्यानंतर आज अखेर अग्रवाल कुटुंबीयांचं हे पंचतारांकित हॉटेल महाबळेश्वर नगरपालिका व महसूल विभागाने  एकत्रित कारवाई करून सील केलं.