NC Times

NC Times

घाटनांद्रे येथील हनुमान मुर्तीस वज्रलेपास प्रारंभ


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)-:- घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील हनुमान मंदिरातील पुरातन अश्या हनुमान मुर्तीस अगदी लोकवर्गणीतून वज्रलेपास व गाभाऱ्याच्या डागडुजीस प्रारंभ करण्यात आला.यावेळी मोठ्या प्रमाणात भाविकभक्त उपस्थित होते. 
  घाटनांद्रे येथील मुख्य विठ्ठल-मारुती चौकात अगदी प्राचीन मुर्ती असणारे पण नव्याने जिर्णोद्धार झालेले हनुमान मंदिर आहे.सदर मंदिरात हनुमानाची पुरातन,आकर्षक व देखणी अशी मुर्ती आहे.सदर मुर्तीवर अगदी कित्येक वर्षे भाविक भक्तांनी तेल व इतर पुजेसाठी आणलेले साहित्य ओतून सदर मुर्तीवर मोठ्या प्रमाणावर एक प्रकारचा थर साठून काही प्रमाणात ही मुर्ती दुखावण्यास सुरवात झाली होती. 
तेव्हा गावातीलच भाविक भक्तांनी एकत्र येऊन सदर मुर्तीवर लोकवर्गणीतून वज्रलेप व गाभाऱ्याची डागडुजी करण्याचे ठरवले.त्यानुसार साधारणतः दीड लाख रुपये निर्धारित खर्चातून होणाऱ्या या कामास तात्काळ प्रारंभ केला.त्यानुसार वज्रलेपाचे काम हे मुर्ती कारागीर शंकर गिड्डे व राजू हालगे यांना तर मुर्तीच्या गाभाऱ्याचे काम हे गोरख पवार व राजू जाधव यांना देण्यात आले.यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.