NC Times

NC Times

घाटमाथ्यावर वटपौर्णिमा अगदी पारंपारीक पद्धतीने साजरा


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर :- कवठेमहंकाळ तालुक्याच्या घाटमाथ्यावरील घाटनांद्रे तिसंगी, वाघोली,गर्जेवाडी,कुंडलापुर, जाखापुर व कुची परिसरात महीलांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आसणारा वटपौर्णिमा हा सण मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.अगदी सकाळ पासूनच महिलांच्या मध्ये या सणाची लगबग दिसून येत होती.
अगदी पारंपारीक पद्धतीनेच महिला वडाच्या झाडाला सात फेरे बांधून पतीच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करीत होत्या.अगदी भल्या सकाळ पासूनच महिला नवीन साड्या नेसून नाकात नथ,हातात हिरवा चुडा,कपाळावर गंध यासह सौभाग्याचे अलंकार परिधान करून गावातील व गावालगत असणार्या तर काही ठिकाणी कुंडीतील वडाच्या झाडाची मोठ्या भक्तिभावाने पूजन करीत होत्या.
वड हा वृक्ष तसा पुर्ण साभार असणारा व वर्षानुवर्षे ठिकणारा वृक्ष.त्याच्या सानिध्यात  प्राणवायुचा‌ मोठ्या प्रमाणात पुरवठा असतो.त्यामुळे मुर्छीत अवस्थेत आसणार्या आपला पती सत्यवानाला जीवदान देण्यासाठी याच वृक्षाखाली बसून पत्नी सावित्रीने यमाकडे पतीच्या प्राणाची याचना केली होती.त्यामुळेच सत्यवानाचे प्राण वाचले होते.तेव्हापासूनच प्रतिच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यासाठीच वटपौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे.
सौभाग्यवती स्त्रिया वडाच्या झाडा भोवती सुत गुंडाळून त्याची मोठ्या भक्तिभावाने पूजन करुन जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून प्रार्थना करुन व एकमेकींना वाण देऊन ओटी भरताना दिसत होत्या.त्यातच सततच्या दुष्काळाने तसेच घाटमाथ्यावरून दिघंची-हेरवाड राज्यमार्ग व विजापूर -गुहागर व रत्नागिरी -नागपुर हे दोन राष्ट्रीय महामार्ग नव्यानेच गेल्यानं यासाठी वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाली आहे.त्यामुळे आपसूकच वडाच्या झाडाची संख्या रोडावली आहे.त्यामुळे महीलांना पुजेसाठी कुंडीतील झाडाची वा वडाच्या झाडाच्या फांदीचा आधार घ्यावा लागला ही शोकांतिका होय.