NC Times

NC Times

माडग्याळ येथे मा. आमदार गोपीचंद पडळकर प्रत्येक शेतकऱ्यांचा समस्या व दुष्काळी परिस्थिती बद्दल संवाद दौरा संपन्न


नवचैतन्य टाईम्स माडग्याळ वार्ताहर(विजय चौगुले)- 
माडग्याळ ता जत येथील मा. आमदार गोपीचंद पडळकर साहेब  01/06/2024 रोजी  माडग्याळ  पंचायत समिती गणातील ,सोरडी,कोळीगिरी,वळसंग, दरीकोणूर , माडग्याळ ,अशा अनेक सर्व गावातील गावाकऱ्यांचा व प्रत्येक गावातील शेतकऱ्यांचा समस्या व दुष्काळी परिस्थिती बद्दल संवाद दौरा संपन्न केले . व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या .माडग्याळ सरपंच सौ. अनिता माळी यांनी मा. आमदार गोपीचंद पडळकर यांना निवेदन देले .या निवेदनात खालील प्रमाणे माडग्याळ निसर्ग ढाबा ते सरहद्द व्हसपेठ या  पाणीपुरवठा निधी मंजूर करणे , खंडोबा देवस्थान चे सभामंडप बांधणे , माडग्याळ ते व्हसपेठ रस्ता मुरुमीकरण करणे , तसेच या. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वतीने  माडग्याळ मध्ये शंभर पाण्याच्या टाक्या वाटप केले . या संवाद कार्यक्रमासाठी माडग्याळ गावातील सरपंच , उपसरपंच, सदस्य, नागरिक, शेतकरी या सर्वांनी प्रत्येक समस्या, वैयक्तिक विकास कामे,  या सर्व कामाबद्दल चर्चा व समस्या सांगितले .  
आमदार साहेबांनी स्वतः सगळ्यांचे काम व समस्या वही मध्ये लिहुन घेतले . व सर्वांचे काम व समस्या १००% मार्गी लावणार असल्याचे वचन दिले . 
यावेळी  माडग्याळ  पंचायत समिती गणातील सर्व सरपंच व सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.