NC Times

NC Times

पाऊसाने उसंत दिल्याने बळीराजाची पेरणीसाठीची लगबग सुरु,खते,बियाणे, औषधाच्या दरवाढीचाही बसतोय फटका


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे) :- कवठेमहंकाळ तालुक्यात अगदी सर्वत्रच कमीजास्त का होईना पेरणी पुरक व समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजाच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.तालुक्याच्या काही भागात  एकदोन दमदार उन्हाळी पाऊस झाल्याने बळीराजाने जमिनीच्याही मशागती चांगल्याप्रकारे केल्या आहेत.तर तदनंतर तीन चार दिवसांपूर्वी सलग पाचसहा दिवस चांगलाच दमदार भीज पाऊस झाल्याने अगदी पेरणी पुरक स्थीती तयार झाली आहे.त्यातच चालू दोनतीन दिवसात पावसाने उसंत घेतल्याने बळीराजाची पेरणीसाठीची मोठी लगबग दिसून येत आहे.
तालुक्यात खरीपाचे सर्वसाधारण क्षेत्र हे २१,३७४ हेक्टर इतके असुन,त्यापैकी पेरणी क्षेत्र हे २०,१०६ हेक्टर इतके आहे.तीनचार दिवसांपूर्वी सलग पाचसहा दिवस चांगलेच पाऊस झाल्याने ओढे, नाले,बंधारे,प्रज्वलित झाले असून लहानमोठ्या तलावातील पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे.सध्या पावसाने उसंत दिल्याने व जमीनीतही पेरणीपूरक ओलावा निर्माण झाला आहे.त्यामुळे बळीराजाची पेरणीसाठीची लगबग दिसून आहे.तो बीबीयाणे,खते,औषधे खरेदीसाठी बाहेर पडला आहे.त्यामुळे आपसूकच कृषी सेवा केंद्रात गर्दी झाल्याची दिसुन येत आहे.सध्या बीयाणे,खते, औषधे यांच्या दरातही वाढ दिसून येत आहे.
तालुक्यात सततच्या दुष्काळाने बैलांची संख्याच रोडावल्याने सर्वच शेतकरी हे आता पेरणी व मशागतीसाठी यांत्रिकीकरणाचा आधार घेत आहेत.त्यातच    पेट्रोल,डिझेलच्या दर वाढीने ट्रॅक्टरद्वारेच्या मशागती व पेरणीसाठीच्या दरातही वाढ झाल्याची दिसून येत आहे.
पेरणी व मशागतीसाठीच्या ट्रॅक्टरचे दर,बी बियाणे,खते व औषधे यांचे दर हे पुढीलप्रमाणे:-
१) ज्वारी (कावेरी) - ७००/- रुपये - (प्रति ५ कीलो.)
२) उडीद (कावेरी) - १४५०/- रुपये  (प्रति ५ किलो.)
३) उडीद (पंकज) - ७००/- रुपये (प्रति ५ कीलो.)
३) मका (६५४०) - १४५०/- रुपये (प्रति ४ किलो.)
४) मका (१९४१- बायर) - १४००/- रुपये (प्रति ३.५ किलो.)
५) भुईमूग - १८५०/- रुपये - (प्रति १० कीलो.)
६) बाजरी (८२०३) २३०/- रुपये (प्रति १.५ किलो)
७) तुर - ३४०/- रुपये (प्रति १ किलो)
तर प्रमुख खतांचे दर हे पुढीलप्रमाणे आहेत :- 
१) डीएपी (जयकिसान) - १३५०/- रुपये (प्रति ५० किलो)
२) सुफला (जयकिसान) - १२५०/- (प्रति ५० किलो)
३)१९१९ (जयकिसान) - १५५०/- रुपये (प्रति ५० किलो)
४) २४२४ (महाजन) - १७००/- रुपये (प्रति ५० किलो)
तर सध्या कमी वेळात व कमी खर्चात सर्वत्रच मशागतीची व पेरणीची कामे ही ट्रॅक्टरच्या सहायानेच केली जात आहेत.त्यातच डीझेल, पेट्रोलच्या सध्याच्या दरवाढीने आपसूकच पेरणी व मशागतीसाठीच्या दरातही वाढ झाली आहे ती पुढीलप्रमाणे --
१) ट्रॅक्टरच्या सहायाने पेरणी करणे १०००/- रुपये (प्रति तास) व
२) कुळवणे ८००/- रुपये (प्रति तास)