NC Times

NC Times

बांधकाम कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास कामगार मंत्र्याच्या घरासमोर आंदोलन-डॉ शंकरदादा माने


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- बांधकाम कामगार संघटना समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने बहुजन असंघटित कामगार संघटनेचे संघटना प्रमुख व समितीचे अध्यक्ष डॉ शंकरदादा माने यांच्या निवासस्थानी विजयनगर-कवठेमहांकाळ येथे एक बैठक पार पडली.या बैठकीमध्ये आपल्या विविध मागण्या बाबत आंदोलन करण्याबाबतचा ठराव एकमताने करण्यात आला.या बैठकीसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगारांसाठी लढा देणाऱ्या कामगार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील शेकडो बांधकाम कामगार संघटना सदस्य असलेली बांधकाम समिती म्हणजे बांधकाम कामगार संघटना समन्वय समिती होय.या संघटनेच्या वतीने यावेळी विविध ठराव करण्यात आले.त्याचबरोबर आपल्या विविध मागण्या संदर्भात कामगार मंत्री सुरेश खाडे व जिल्हाधिकारीसो यांना निवेदन देण्याचेही ठरविले गेले.सदर बैठकीनंतर समितीच्या वतीने सांगली येथे सुरेश खाडे यांच्या पत्नी सौ खाडे (वहिनी) यांना प्रत्यक्ष भेटून व अप्पर जिल्हाधिकारी ज्योती पाटील तसेच सरकारी कामगार अधिकारी चंद्रकांत साळुंखे यांनाही निवेदनही देण्यात आले.
सदर निवेदनामध्ये असे म्हटले आहे की लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे गेल्या तीन महिन्यापासून नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज सादर करण्याची व लाभ मिळण्याची प्रक्रिया पूर्णपणे बंद होती.
त्यामुळे लाखो बांधकाम कामगार सर्व प्रकारच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.त्यांचे नोंदणी,नूतनीकरण व लाभ मिळण्याची प्रक्रिया पूर्णपणे कोलमडली आहे.त्यामुळे आचारसहिता संपल्यानंतर त्यांना लाभ मिळण्यासाठी नूतनीकरण व लाभाचे अर्ज सादर करण्यासाठी प्रक्रिया गतिमान करण्याची व जलद गतीने काम करण्याची आवश्यकता आहे.मात्र प्रत्येक जिल्हा कार्यालयामार्फत केवळ १०० नोंदणी व ५० नूतनीकरण तसेच लाभाच्या अर्ज पूर्वी २५० एवजी आता १५० मर्यादा ठेऊन सादरीकरणावर निर्बंध घातले आहेत.लाभाच्या अर्ज स्वीकारण्यावर मर्यादा घातल्याने मोठ्या प्रमाणावर बांधकाम कामगार लाभापासून वंचित राहणार आहेत.त्यामुळे बांधकाम कामगार वर्ग हा लाभापासून पुन्हा वंचित राहणार आहे.
त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष पसरला आहे.याबाबत आपण त्वरित कारवाई करून नोंदणी नूतनीकरण व लाभाच्या अर्ज सादरीकरणावरील निर्बंध व मर्यादा पूर्णपणे हटवावी व जास्तीत जास्त बांधकाम कामगारांना मंडळाचे लाभ मिळण्याबाबत मार्ग सुकर करावा व त्यातील सर्व प्रकारचे अडथळे दूर करावे असा मंडळाला आदेश करावा असे नाही झाल्यास २० जुन रोजी सांगली येथील कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या निवासस्थानावर धडक बेमुदत तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा यामध्ये देण्यात आला आहे.यावेळी समितीचे अध्यक्ष डॉ शंकरदादा माने,उपाध्यक्ष संदीप पाटोळे, सचिव वनिता पटेल, सल्लागार अजित        खंदारे,विजय बचाटे,विनायक हेगडे,अफजल मुजावर,गौतम  कांबळे, इब्राहिम पेंडारी,निखिल गाडे,नितीन माने,प्रदीप      साठे,राजू कांबळे,अमित चव्हाण,सुनील कांबळे,राहुल      हिरोगडी,रूपाली शेडगे,सुरेखा शेडगे,मानसिंग माने,धीरज    मदने,सचिन शेडगे, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.