NC Times

NC Times

घाटनांद्रे सर्वोदय हायस्कूलचा निकाल सलग पाचव्यांदा शंभर टक्के निकालाची परंपरा कायम


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे):- घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील सर्वोदय हायस्कूलच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेची यशस्वी परंपरा कायम राखत सलग पाचव्यांदा शाळेचा शंभर टक्के निकाल लावला आहे.तसेच सदर शाळा निकालाच्या बाबतीत कुची केंद्रातही प्रथम आली आहे.त्यांच्या या यशाचे परिसरातून मोठे कौतुक केले जात आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये कु वैष्णवी संजय शिंदे हिने ९०.६० टक्के गुण मिळवून शाळेत पहिली,कु राजेश्वरी रुपेश भंडारे ही ८० टक्के गुण मिळवून दुसरी तर वेदिका विजय साळुंखे ही ८१.३० टक्के गुण मिळवून तिसरी आली आहे.सदर शाळेचे एकुण ३६ विद्यार्थी या परीक्षेस प्रविष्ट झाले होते.यामध्ये सर्वच्या सर्व विद्यार्थ्यां उतिर्ण झाले आहेत.सलग पाचव्यांदा या शाळेने शंभर टक्के निकाल लावून एकप्रकारे आपला दबदबाच निर्माण केला आहे.
याकामी या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक बी एस शिंदे,शिक्षक सर्वश्री सौ साधना धेंडे-कांबळे,लक्ष्मण लवटे,    प्रकाश वाघमोडे,भारत काळे,जयसिंग बोबडे,दिलीप खाडे,    शोभा पाटील,सौ विद्या पाटील,जयानंद स्वामी,सचिन        पाटील,शिक्षकेतर कर्मचारी साहील पवार,बाळासाहेब रास्ते  शाळा व्यवस्थापन समितीचे संतोष शिंदेसह पालकांचे अगदी यशस्वी मार्गदर्शन लाभले.