NC Times

NC Times

श्री सिध्देश्वर हायस्कूल नागज येथे तब्बल २४ वर्षानंतर उस्फूर्तपणे भरला स्नेह मेळावा


नवचैतन्य टाईम्स नागज प्रतिनिधी(हणमंत देशमुख)-   नागज येथील श्री सिध्देश्वर हायस्कूल (ता. कवठेमहांकाळ) येथे नुकताच स्नेह मेळाव्याचे उत्स्फूर्तपणे आयोजन करण्यात आले होते. सन २००० मधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी हा स्नेह मेळावा आयोजीत केला होता. हा स्नेह मेळावा अतिशय यशस्वीपणे पार पाडला. तब्बल चोविस वर्षानंतर सर्वजण एकञ आल्यामुळे सर्वांचा आनंद गगनात मावत नव्हता.
“मैञी शाळेतील बाकांवरची …आठवणींच्या नात्याची….!” या स्नेह-मेळाव्यासाठी माजी शिक्षक (गुरुजनवर्ग) मोठ्या संख्येने उपस्थित होता. स्नेहमेळाव्यासाठी मजनू तांबोळी,उल्हास काळे,विजय कोरे,सौ सुरेखा पाटील,सौ.वैशाली फिर्मे,सौ.माधुरी पाटील यांनी परिश्रम घेत सर्वाना एकत्र आणुन कार्यक्रमाचा उत्कृष्ट नियोजन केले. कार्यक्रमाची सुरुवात फेटे बांधून व गुलाब पुष्प देऊन तसेच स्वागत जल देऊन करण्यात आली. त्यानंतर सर्व गुरुजन वर्गाने मिळून दीपप्रज्वलन केले.पदाचा किंवा प्रतिष्टेचा बुरका बाजुला ठेवून केवळ वर्गमित्र म्हणून एकमेकांची विचारपूस केली.यामध्ये नोकरदार शेतकरी सर्व घटक एकत्र होते.सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मनोगत व्यक्त केले.ज्या शाळेच्या मैदानावर खेळलो ,बागडलो त्याला चोवीस वर्ष झाली .त्यामुळे सर्वजण चांगलेच हरवून गेले होते.यावेळी प्रमुख पाहुणे शाळेचे प्राचार्य बाळु पोरे सर, श्री घागरे सर,श्री देसाई सर,श्री स्वामी सर,श्री कोरे सर,तसेच विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.  


सर्व उपस्थितांसाठी स्वागतगीत व समूहगीत माजी विद्यार्थीनी सादर केले. यावेळी माजी विद्यार्थी व शिक्षक हयात नाहीत त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. सर्व गुरुजन वर्गाचा सत्कार माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते शाल ,श्रीफळ, गुलाबपुष्प  देऊन सत्कार करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांनी खूप आनंदाने आपला परिचय करून दिला.या कार्यक्रमावेळी विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम संगीत खुर्ची व काही मुलांनी मजनू तांबोळी,समाधान साबळे, समीर मुल्ला,यांनी स्वतः गाणी गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली,गाण्यावर नृत्य पण करण्यात आला.
यावेळी सर्व गुरुजनांनी आपले प्रेरणादायी मनोगत व्यक्त केले शेवटी अध्यक्षीय भाषण झाले त्यामध्ये अध्यक्षांनी अमूल्य असे मार्गदर्शन केले. आपल्या आईवडिलांना प्रथम स्थान द्या त्यांना कधीही विसरु नका , त्याचबरोबर आपण आपली प्रगती करत असताना संधी निर्माण करावी लागते आणि त्या संधीचं आपण सोनं केलं पाहीजे. आपण ज्या प्रकारची पुस्तके वाचतो तसेच आपले विचार असतात व ते विचार कृतीच्या माध्यमातून निदर्शनास येतात. अतिशय सुंदर अशा शब्दांमध्ये अध्यक्ष बाळु पोरे सर यांनी सर्व विद्यार्थ्यांची मार्गदर्शनपर कानऊघडणी देखील केली.
या कार्यक्रमाचे सूञसंचालन मजनू तांबोळी यांनी केले. तसेच या कार्यक्रमातील ऊल्लेखनिय बाबी म्हणजे  जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती.या कार्यक्रमाचे आभार सध्या न्यायाधीश म्हणून सेवा बजावीत असलेले हरिभाऊ देशिंगे यांनी मानले.तर कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम् गाऊन करण्यात आली. अतिशय सुंदर रित्या पार पडलेल्या या स्नेहमेळाव्याच्या शेवटी गुरुजनांसह विद्यार्थी देखील भावुक झाले होते. शेवटी जड अंतकरणाने एकमेकांना निरोप देण्यात आला.