NC Times

NC Times

भाजप उमेदवार हिना गावित यांचा मोबाईल हॅक त्यांच्या मोबाईलवरून काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन


नवचैतन्य टाईम्स  धुळे (प्रतिनिधी)-  देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज चौथ्या टप्प्याचे मतदान प्रक्रिया पार पडत असताना नंदुरबार लोकसभेमध्ये महायुतीच्या उमेदवार असलेल्या डॉ. हीना गावित यांचा मोबाईल हॅक झाल्याची माहिती समोर आहे. आज नंदुरबार लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडत असताना दिवसभर सर्वत्र शांततेत मतदान पार पडत आहेत. मात्र अशातच आज दुपारी महायुतीच्या उमेदवार असलेल्या हिना गावित यांनी आपला मोबाईल हॅक करून काँग्रेस पक्ष त्यांच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन करत असल्याची धक्कादायक माहिती त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिली आहे.
यावेळी त्यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून सांगितले की, मतदारांचा वाढता कौल बघून विरोधकांच्या पायाखालीची वाळू सरकली आहे. म्हणून त्यांनी आता रडीचा डाव खेळण्यास सुरुवात केली असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, माझ्या मोबाईलला हॅक करून माझ्या मोबाईलचा नंबरवरून त्यांच्या पक्षासाठी मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. माझ्या विरोधात षडयंत्र सुरू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
विरोधकांनी केलेल्या या खेळी विरोधात त्यांनी नंदुरबार पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला आहे. काँग्रेस पक्ष हा खालच्या स्तरावर जाऊन हा रडीचा डाव खेळत आहे. याला नंदुरबारची जनता नक्कीच उत्तर देईल, असेही हिना गावित म्हणाल्या. माझ्या मोबाईल नंबर वरून जर कुठल्याही मतदाराला फोन आला तर त्याने त्यांना बळी पडू नये. कारण काँग्रेसने हा शेवटचा रडीचा डाव खेळला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे.