NC Times

NC Times

साताऱ्याची ईव्हीएम मशिन ठेवलेल्या गोदामाच्या परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा कोलमडली; शरदचंद्र पवार गटाची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार


नवचैतन्य टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे)-सातारा लोकसभा मतदारसंघाची एमआयडीसीमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाच्या परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा दि. १० मेपासून कोलमडली असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबतची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्याकडे केले आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डुडी यांनी तक्रारीची तत्काळ दखल घेत ठेकेदारास कारणे दाखवा नोटीस बजावली. ठेकेदाराने तत्काळ दखल घेत दिवसभर ही यंत्रणा सुरळीत करण्याचे काम सुरू केले होते.
दरम्यान, याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता गेल्या दोन दिवसापासून या परिसरात वळवाचा पाऊस पडत असल्याने येथील काही सीसीटीव्हीमध्ये बिघाड झाल्याचे सांगण्यात आले.
सातारा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार, दिनांक ७ मे रोजी ६३.१६ टक्के मतदान झाले. १८,८९,७४० लाख मतदारांपैकी ११ लाख ९३,४९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीत एकूण १६ उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघात प्रमुख लढत महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे विरुद्ध महायुतीचे भाजपचे उदयनराजे भोसले यांच्यात झाली आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय ईव्हीएम जिल्हा मार्केटिंग फेडरेशन, एमआयडीसी, सातारा येथील गोदामात सुरक्षित ठेवण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी ईव्हीएम सुरक्षितेसाठी जिल्हा पोलीस यंत्रणेबरोबरच स्वतंत्र सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, ही सीसीटीव्ही यंत्रणा दिनांक १० मेच्या सकाळपासून बंद असल्याची बाब राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार प्रतिनिधींच्या निदर्शनास आली. याबाबत या प्रतिनिधीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सीसीटीव्ही ठेकेदारास कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर ठेकेदाराने सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम सुरू केले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांचे उमेदवार प्रतिनिधी राजकुमार पाटील यांनी सीसीटीव्ही यंत्रणा व त्याची लिंक दि. १० रोजी सकाळपासून वारंवार बंद दिसत असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती. ईव्हीएम मशिनच्या संरक्षणासाठी बसवलेच्या सीसीटीव्हीची लिंक ही उमेदवार व त्यांच्या उमेदवार प्रतिनिधींना दिली आहे. ही लिंक दि. १० रोजीच्या सकाळपासून गोडावून परिसरातील सीसीटीव्ही कव्हरेज बंद दिसत आहे, अशी तक्रार करण्यात आली. या तक्रारीची दखल सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेऊन लगेच संबंधित ठेकेदारास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
दरम्यान, ईव्हीएम मशिन ठेवलेल्या गोदाम परिसरात ४३ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. गेल्या दोन दिवसापासून साताऱ्यासह परिसरात वळवाचा पाऊस पडत आहे. पावसामुळे काही सीसीटीव्ही कॅमेरामध्ये बिघाड झाल्याने ही यंत्रणा बंद पडले असल्याचे सांगण्यात आले.
सातारा लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार, दिनांक ७ मे रोजी ६३.१६ टक्के मतदान झाले. १८,८९,७४० लाख मतदारांपैकी ११ लाख ९३,४९२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीत एकूण १६ उमेदवार रिंगणात आहेत. या मतदारसंघात प्रमुख लढत महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे विरुद्ध महायुतीचे भाजपचे उदयनराजे भोसले यांच्यात झाली आहे.
सीसीटीव्ही बंद असल्याच्या तक्रारीनंतर प्रशासकीय यंत्रणेने त्याठिकाची तपासणी केली असता गोदामामध्ये संरक्षणासाठी पोलीस व स्वतंत्र सीसीटीव्ही यंत्रणा सुरू आहे. मतदान प्रक्रियेची सर्व ईव्हीएम मशिन्स गोदामात सुरक्षित ठेवण्यात आली आहेत, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सांगितले.