NC Times

NC Times

सांगली शहरातील मालू हायस्कूल येथे बोगस मतदानाचा सुळसुळाट


नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजू शेख)- सांगली लोकसभा मतदारसंघात सर्वत्र मतदान शांततेत होत असल्याचे चित्र दिसून येत असताना दुसरीकडे सांगलीच मात्र भयानक प्रकार घडला असल्याचे समोर आले आहे. सांगली शहरातील मालू हायस्कूल येथे असणाऱ्या मतदान केंद्रामध्ये अनेक महिला या मतदान करण्यासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचे मतदान अगोदरच झाल्याचे सांगण्यात आले. याबाबतची माहिती संबंधित महिलांनी राष्ट्रवादीचे युवा नेते विज्ञानदादा माने यांना दिल्यानंतर त्या ठिकाणी विज्ञानदादा माने यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता या ठिकाणी पोलिसांनी हस्तक्षेप करीत विज्ञानदादा माने यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचे महिलांनी सांगितले. त्या ठिकाणी बाहेरील अनेक मतदार मतदानाला आले नसताना त्यांच्या नावाने बोगस मतदान केल्याची तक्रार महिलांनी केल्यानंतर पोलिसांनी आपणाला अपशब्द वापरल्याची तक्रार संबंधित महिलांनी विज्ञानदादा माने यांच्याकडे केली.

यावेळी त्यांच्यामध्ये आणि पोलिसांमध्ये चांगलीच झटापट झाल्याने या ठिकाणी काही काळ गोंधळ निर्माण झाल्याचे वातावरण पाहावयास मिळाले. एकूणच जिल्ह्यात शांततेने चाललेल्या मतदानाला या प्रकाराने गालबोट लागले असून या ठिकाणी काही प्रमाणात बोगस मतदान झाल्याचा आरोप मतदानासाठी आलेल्या महिला मतदारांनी केल्याचे बोलले जात होते.