NC Times

NC Times

रस्ता ओलांडणाऱ्या वाघाला कारनं दिली धडक व्हिडीओ पाहणाऱ्याच्या डोळ्यात पाणी

 
 वाघ हा जंगलातील सर्वात खतरनाक शिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्यानं एण्ट्री घेताच जंगल अक्षरश: भितीनं थरथरतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वाघाला पाहताच पक्षी सुद्धा जीव वाचवण्यासाठी उडू लागतात. अशा या खतरनाक प्राण्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. पण हा व्हिडीओ पाहून तुम्हाला भिती नाही उलट वाघाचीच दया येईल. कारण या वाघाला रात्रीच्या अंधारात एका धावत्या गाडीनं टक्कर मारली होती. गाडीच्या धडकेनं जखमी झालेला वाघ रस्त्याच्या कडेला जाऊन पडला. पुढे त्याचं काय झालं हे आता तुम्हीच पाहा. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही. (फोटो सौजन्य - @Prateek34381357/Twitter)
 ही घटना भंडारा-गोंदीया मार्गावर घडली आहे. तर त्याचं झालं असं की, नागझिरा वन्यजीव अभयारण्यात एक वाघ रस्ता ओलांडत होता. तेवढ्यात समोरून एक गाडी आली अन् तिनं वाघाला जोरदार धडक दिली. रात्रीच्या अंधारात ड्रायव्हरला वाघ दिसला नाही, तर दुसरीकडे अचानक डोळ्यांवर गाडीचे लाईट पडल्यामुळे वाघ गोंधळला आणि तो जागीच उभा राहिला त्यामुळे हा अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण या अपघातात वाघ जबरदस्त जखमी झाला. इतका की त्याला धड उभं सुद्दा राहाता येत नव्हतं. शेवटी तो अक्षरश: सरपटत रस्त्याच्या पलिकडे गेला. या वाघाची दयनीय अवस्था पाहून तुमच्याही डोळ्यात अश्रू येतील.
 मीडिया रिपोर्टनुसार या जखमी वाघाला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं होतं. पण उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. जंगलात गाडी चालवताना हळूवारपणे चालवा. तुमची वेगमर्यादा ४० kmph च्या वर जाता नये असे फलकही जागोजागी लावलेले आहेत. मात्र तरी देखील काही लोकं या सूचनांकडे दुर्लक्ष करून नियमांचं उल्लंघन करतात. अन् त्यामुळेच हा अपघात घडला आहे. हा व्हिडीओ @Prateek34381357 या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ ४ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून जवळपास सर्वांनीच या कार चालकावर जोरदार टीका केली आहे. वाघाचा जीव घेतल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करा अशी मागणी करत आहेत. असो, या प्रकरणी कुठली शिक्षा व्हायला हवी? तुम्हाला काय वाटतं.