NC Times

NC Times

कवठेमहांकाळमध्ये गाथा पारायण सोहळ्यास प्रारंभ


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)-सालाबादप्रमाणे याही वर्षी समस्त वारकरी संप्रदाय कवठेमहांकाळ यांच्या वतीने श्री महाकाली मंदिरा लगत असणार्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात अमृततुल्य गाथा पारायणा सोहाळ्यास प्रारंभ करण्यात आला.यानिमीताने विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सोहळा समितीच्या वतीने देण्यात आली.या सोहळ्याच्या निमित्ताने हरिपाठ,भजन,कीर्तन,आरती,काकडा,जागर यांसारख्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा,विणा व ग्रंथ पुजन करण्यात आले.
सदर पारायणा निमित्ताने गुरुवार दिनांक ९ रोजी सायंकाळी ७ ते रात्री ९ यावेळेत हभप अशोक जाधव-गुरुजी (कवठेमहांकाळ) यांचे किर्तन होणार आहे.शुक्रवार दिनांक १० मे रोजी सायंकाळी ७ ते रात्री ९ यावेळेत हभप किसन काशिद - महाराज (मोरगाव) यांचे किर्तन होणार आहे.शनिवार दिनांक ११ मे रोजी सायंकाळी ७ ते रात्री ९ यावेळेत हभप हणमंत नाईक -महाराज (एकोंडी) यांचे किर्तन होणार आहे.रविवार दिनांक १२ मे रोजी सायंकाळी ७ ते रात्री ९ यावेळेत हभप हणमंत मिसाळ -महाराज (कर्नाळ) यांचे किर्तन होणार आहे.सोमवार दिनांक १३ मे रोजी सायंकाळी ७ ते रात्री ९ यावेळेत हभप कृष्णा पाटील -महाराज (करोली-टी) यांचे किर्तन होणार आहे.मंगळवार दिनांक १४ मे रोजी सायंकाळी ७ ते ९ यावेळेत हभप बाळकृष्ण पाटील -महाराज (वडगांव -ता तासगांव) यांचे किर्तन होणार आहे.बुधवार दिनांक १५ मे रोजी सायंकाळी ७ ते रात्री ९ यावेळेत हभप सचिन भाट- महाराज (तासगांव) यांचे किर्तन होणार आहे.
 तर गुरुवार दिनांक १६ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ यावेळेत हभप कृष्णा महाराज (ढालगावकर) यांचे काल्याचे किर्तन होऊन महाप्रसाद वाटप करुन सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे.सदर सोहळ्यस व्यासपीठ चालक म्हणून हभप गणेश कुंभार,हभप अनिल यादव व हभप अशोक जाधव हे काम पहाणार आहेत तर मृदंग सेवा ही हभप माऊली महाराज परभणीकर हे बघणार आहेत.तरी यांचा लाभ तमाम भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.