NC Times

NC Times

वरमाला घालताना नवरा-नवरीचं बिनसलं, मग स्टेजवरच सुरु झाल फाईट


लग्न म्हटलं की मजा-मस्ती गडबड गोंधळ या गोष्टी तर आल्याच. पण काही वेळेस लग्नात अशा काही गोष्टी घडतात की ज्याबद्दल कधी कोणी स्वप्नातही विचार केला नसेल. अशाच एका लग्नामधील धक्कदायक व्हिडीओ समोर आला आहे. एकमेकांना हार घालत असताना अचानक नवरदेव आणि नवऱ्यामुलीमध्ये काही तरी बिनसलं. आधी दोघं एकमेकांवर शब्दांचे वार करू लागले. अन् मग पाहता पाहता या भांडणाचं रुपांतर चक्क हाणामारीत झालं. भर मांडवात या दोघांनी एकमेकांना अक्षरश: हकलून काढलं. दोघंही एकमेकांचे गळे पकडून हाणामारी करताना दिसले. हे अजब लग्न पाहून खरंच तुम्ही सुद्धा डोक्याला हातच लावाल.
 हे भांडण का सुरू झालं?
 हा व्हिडीओ @PalsSkit या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही दोघांना भर मांडवात हाणामारी करताना पाहू शकता. दरम्यान पाहुणे मंडळी हे भांडण रोखण्याचा प्रयत्न करतायेत. पण दोघंही ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. उलट ते शक्य तितकी ताकत लावून दोघं एकमेकांना मारताना दिसतायेत. हा व्हिडीओ आतापर्यंत ३ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी या कपलची फिरकी घेतली आहे.
“या दोन अनोळखी लोकांनी जे काम ६ महिन्यानंतर करणं अपेक्षित आहे ते काम यांनी मांडवातच सुरू केलंय.या दोघांचे ३६ गुण जुळवणाऱ्या पंडीतजीचा शोध घ्या.” अशा आशयाच्या गंमतीशीर प्रतिक्रिया या व्हिडीओवर दिल्या जात आहेत. असो, जर तुम्हाला हे कपल दिसलं तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल?