NC Times

NC Times

घाटनांद्रे हायस्कूल मध्ये माजी विद्यार्थींचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे वार्ताहर(जालिंदर शिंदे):- घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील सर्वोदय हायस्कूलच्या सन २००४-५ च्या इयत्ता दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शाळेच्या परिसरातच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी तात्कालीन शिक्षकांसह आजी शिक्षक, कर्मचारी व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रथम तात्कालीन शिपाई शहाजी शिंदे यांच्या हस्ते घंटा वाजवूनच मान्यंवरांसह शिक्षक व माजी विद्यार्थी स्थानापन्न झाले.तदनंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून स्नेहमेळाव्याचे विधीवत उदघाटन करण्यात आले.
यावेळी प्रविण शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना कार्यक्रमाची रूपरेषा विशद केली.यावेळी उपस्थित शिक्षक व माजी विद्यार्थ्यांनी तत्कालीन शालेय आठवणीला चांगलाच उजाळा दिला.यामध्ये माजी मुख्याध्यापक एस के पाटील व एस एस कुंभार,मुख्याध्यापक बी एस शिंदे,साधना धेंडे-कांबळे,दिलीप खाडे सह माजी विद्यार्थी प्रविण शिंदे, सुर्योधन शिंदे,सचिन शिंदे,मनिषा शिंदे,निलम कुंभार,सलमा मुलाणी,कांचन कांबळे यांचा समावेश होता.
यावेळी उपस्थित माजी विद्यार्थी तात्कालीन शालेय आठवणीत चांगलेच रमुन गेले होते.ज्या शाळेत शिकलो,ज्या बाकावर बसून शिक्षणांचे धडे गिरवले.ज्या शाळेच्या मैदानावर खेळलो बागडलो त्याला तब्बल वीस वर्षांनी भेटताना आलेल्या आठवणींच्या कल्लोळात ते चांगलेच हारवून गेले होते.जणू शाळेचा परिसरच त्यांच्याशी हितगुज करतोय या आविर्भावात ते होते.आपला वर्ग,आपला बेंच,आपले शिक्षक,त्यांचे शिकवणे,त्यांनी केलेली शिक्षा,त्यांना आपण दिलेला त्रास अश्या एकना अनेक आठवणींना उजाळा यावेळी मिळाला.
 शेवटी मात्र शाळेचा, शाळेच्या परिसरातचा व शिक्षकांचा निरोप घेताना मात्र उपस्थित सर्वांच्याच डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.जाताना प्रत्येकजण आपली शाळा कशी आहे हे डोळ्यांमध्ये साठवून घेत होते.
 मुख्याध्यापक बी एस शिंदे, माजी मुख्याध्यापक एस के पाटील व एस एस कुंभार,माजी शिक्षीका प्रमीला शिंदे -पाटील,सौ साधना धेंडे-कांबळे,प्रकाश वाघमोडे,दिलीप खाडे,जयसिंग बोबडे,भारत काळे,लक्ष्मण लवटे,स्वामी सर सचिन शिंदेसह माजी विद्यार्थी प्रविण शिंदे,अमर घाटके, सचिन शिंदे,सुर्योधन शिंदे,नितीन गुरव,राजेश शिंदे,निलम कुंभार,मनिषा शिंदे,पुनम झांबरे,सलमा मुलाणी,रेश्मा शिंदे,वर्षा शिंदे,सुनिता शिंदे,स्वाती जाधव,कांचन कांबळे,वंदना शिंदे,संध्या शिंदे, प्रमिला सुर्यवंशीसह पालक उपस्थित होते शेवटी आभार सुर्योधन शिंदे यांनी मानले.