NC Times

NC Times

मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील जाहिरात फलकांचे स्ट्रक्चरल ऑडीट करा - जितेंद्र डूडी


नवचैतन्य टाईम्स सातारा प्रतिनिधी(शरद झावरे)-
मुंबई घाटकोपर येथील जाहिरात फलक पडून झालेल्या दुर्घटनेनंतर पर्यटन स्थळावर ही अनधिकृतपणे उभारण्यात आलेले असे जाहिरात फलक हटवण्यासाठी निसर्गप्रेमींनी कंबर कसली आहे. रस्त्यापासून पाच ते दहा फुटांवर डोंगर टेकडीवर व खोलदरीत फलक उभारण्यात आले आहेत. काही फलक खोल खड्डे काढून उभारण्यात आले आहेत. त्यामुळे वाहन चालकाच्या डोक्यावर सतत टांगती तलवार असते. या फलकावर पाचगणी महाबळेश्वर येथील व्यावसायिकांच्या जाहिराती करण्यात आल्या आहेत. महामार्गापासून पर्यटन स्थळाकडे सुरू होणाऱ्या सुरूर महाबळेश्वर रस्त्यावर असे फलक उभारण्यात आले आहेत. 
पाचगणी महाबळेश्वर ही पर्यटन स्थळे डोंगर सपाटीवर वसलेली आहेत. या परिसरात नेहमीच वेगवान वारे वाहत असतात. मात्र याची कोणतीही काळजी न घेता धोकादायक रीतीने नव्याने हे फलक उभारण्यात येत् आहेत. वाई येथील अनेक सामाजिक संघटनांनी व कार्यकर्त्यांनी निसर्गप्रेमींनी या फलकांच्या उभारणीला आक्षेप घेतलेला आहे.      याबाबत अनेकदा शासकीय कार्यालयात तक्रारी करण्यात आल्या आहेत. घाट रस्त्यावर खाजगी जागा मालकांनी आमच्या जागेत आम्ही काहीही करू शकतो असे सांगून रस्त्यापासून तीन ते पाच मीटर अंतरावर असे फलक उभारले आहेत. या जाहिरात फलकांचे पर्यटन स्थळावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. यामुळे पर्यटन स्थळाचे बकाल पण वाढले आहे.
जिल्ह्यातील जाहिरात फलकांचे स्ट्रक्चरल ऑडीट करा
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील जाहिरात फलकांचे स्ट्रक्चरल ऑडीट करा. शहरी भागात नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी तर महामार्गावरील स्ट्रक्चरल ऑडीट रस्ते विकास महामंडळाने करावे. स्ट्रक्चरल ऑडीटचे अहवाल येत्या १५ दिवसांत सादर करावे. या कामाला प्राधान्य द्यावे असे आदेश जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, सातारा यांनी दिले आहे.