NC Times

NC Times

सिए सोबत ब्रेकअप करणं तरुणीला पडलं भारी, घेतला असा बदला की यापुढे मुलांचे पैसे खर्च करताना करेल १० वेळा विचार


रिलेशनशिपमध्ये ब्रेकअप हा एक त्रासदायक क्षण असतो. ब्रेकअपमुळे लोकांच्या मनावर आणि शरीरावर खोल परिणाम होतो. काही जण तर ब्रेकअपच्या झटक्यामुळे नैराश्येत देखील जातात. अन् याचिच प्रचिती देणारी एक घटना समोर आली आहे. एका तरुणीनं आपल्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप केलं. खरं तर ही एक सामान्य गोष्ट आहे. कारण देशभरात असे शेकडो ब्रेकअप रोज होत असतील. पण लक्षवेधी बाब म्हणजे हा तरुण काही साधासुधा नाही. तो व्यवसायानं सनदी लेखापाल अर्थात सिए आहे. त्यानं या तरुणीवर खर्च केलेल्या एक एक पैशांचा हिशोब ठेवलाय. आणि ब्रेकअपनंतर पूर्ण हिशोब दुकानाच्या बिलांसकट तिला पाठवला. गेल्या सात महिन्यात त्यानं या तरुणीवर हजारो रुपये खर्च केले होते. अन् या खर्चाचा आकडा पाहून खरंच तुमचं डोकं देखील चक्रावून जाईल. चला तर मग पाहूया ती व्हायरल होणारी एक्सल शीट. trolls_official/Instagram)
 तरुणानं किती रुपये खर्च केले?
 खर्चाची ही यादी Trolls Official या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आली आहे. यापूर्वी ही यादी त्या तरुणीच्या मैत्रीणीनं इंटरनेटवर शेअर केली होती. सोबत तिनं एक विशेष कॅप्शन लिहून तिच्या एक्सबॉयफ्रेंडला उपरोधिक टोले देखील मारले होते. “सिए चा अर्थ आहे चिंधी चोर. माझ्या मैत्रीणीनं एकदा आदित्य नावाच्या तरुणाला डेट केलं होतं. तो व्यवसायानं सिए होता. ब्रेकअपनंतर त्यानं खर्च केलेल्या एक एक रुपयाची यादी तयार केली. शिवाय त्यानं खर्चाच्या रकमेवर १८ टक्के टॅक्स देखील लावला आहे.” अशा आशयाची कॅप्शन लिहून तिनं आपल्या मैत्रीणीची बाजू घेत तिच्या एक्स बॉयफ्रेंडवर टीका केली. अर्थात ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली अन् आता नेटकरी त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.
 
खर्चाची ही यादी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. ही यादी वाचून कोणी त्या तरुणीचं कौतुक करतेय, कारण असे हिशोब ठेवणाऱ्या मुलापेक्षा ब्रेकअप केलेलं बरं असं मत त्याचं आहे. तर कोणी हिशोब ठेवून गर्लफ्रेंडला धडा शिकवल्याबद्दल सिए तरुणाचं कौतुक करतेय. कारण त्यांच्या मते या प्रकरणात मुलाची बाजू बरोबर आहे. असो, खर्चाची ही यादी पाहिल्यानंतर तुमच्या डोक्यात कुठले विचार आले? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया द्या.