NC Times

NC Times

लेकीला दोन मुलं होऊनही जावई पळून जाईल अशी भीती सासूबाईंना


नवचैतन्य टाईम्स मुंबई प्रतिनिधी(नेहाल हसन)-हिंदी चित्रपटसृष्टीत असे फार कमी कलाकार आहेत ज्यांनी आपल्या पात्रांमधून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. बऱ्याचजणांना त्यांच्या खऱ्या नावाऐवजी त्यांच्या पात्रांच्या नावानेच ओळखले जाते.अशा कलाकारांमध्ये पंकज कपूर यांचा समावेश होतो.
छोटा पडदा असो की मोठा, पंकज कपूर यांनी सगळीकडेच आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. करमचंद जासूस, मुंगेरीलाल के हसीन सपने, ऑफिस ऑफिस, जाने भी दो यारों, मंडी मोहन जोशी, हाजीर हो, तमस, रोजा यांसारख्या सिनेमांमध्ये त्यांनी प्राण फुंकला.
 २९ मे १९५४ रोजी पंजाबमध्ये जन्मलेल्या पंकज यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. त्यामुळे त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनय शिकला आणि अभिनेता होण्यासाठी मायानगरी गाठली. त्यांनी १९८२ मध्ये श्याम बेनेगल यांच्या 'आरोहण' चित्रपटातून पदार्पण केले.
 पंकज जसे त्यांच्या सिनेमासाठी ओळखले जातात तसेच ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत होते. पंकज कपूर यांनी पहिले लग्न नीलिमा अझीमशी केले. अभिनेता शाहिद कपूर या दोघांचाच मुलगा. शाहिदच्या जन्मानंतर लगेचच त्यांचा आणि नीलिमाचा घटस्फोट झाला. त्यानंतर त्यांनी अभिनेत्री सुप्रिया पाठकशी लग्न केले. मात्र, सुप्रियाची आई अभिनेत्री दिना कपूर यांना पंकज कपूरवर कधीच विश्वास बसला नाही.
काही काळापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी याचा खुलासा केला होता. पंकज कपूरसोबत आयुष्याचा प्रवास कसा सुरू झाला हे सुप्रिया यांनी सांगितले. त्यांना दोन मुलं झाल्यानंतरही त्यांची आई त्यांना नेहमी सांगायची की पंकज कपूर तिला सोडून जाईल.
दिना पाठक यांनी कधीच पंकज कपूरवर विश्वास ठेवला नाही
दिना पाठक या एकेकाळच्या प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्यांची धाकटी मुलगी सुप्रियाने १९८८ मध्ये पंकज कपूरशी लग्न केले. त्यावेळी पंकज कपूर यांनी त्यांची पहिली पत्नी नीलिमा अजीम हिला घटस्फोट दिला होता. यामुळेच दिनाने पंकज कपूरवर कधीही विश्वास ठेवला नाही.
 सासूबाईंचा पंकज कपूरवर संशय
सुप्रिया पाठक यांनी ट्विंकल खन्ना ट्वीक इंडिया पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत अनेक खुलासे केले आहेत. एक प्रसंग शेअर करताना त्यांनी सांगितले की, त्यांच्या आईला नेहमी शंका होती की पंकज कपूर त्यांना सोडून जाईल. जेव्हा ट्विंकलने त्यांना विचारले की लग्नाबाबत मोठी बहीण रत्ना पाठकचा काही सल्ला घेतला होता का? तेव्हा सुप्रियाने उत्तर दिले, 'सल्ला कोण घेणार?' सर्वांनी प्रयत्न केला पण मी त्यांचे ऐकले नाही. तोपर्यंत मी तिथपर्यंत पोहोचले होते की मला कोणाचेच ऐकायचे नव्हते. मी बरेच काही ठरवले होते.
त्याने पुढे सांगितले की, लग्नाच्या अनेक वर्षानंतरही त्यांच्या आईला पंकज कपूर मला सोडून जाईल असा संशय असायचा. सुप्रियाला दोन मुलं झाल्यावरही दिना पाठक यांना जावई पंकज कपूरवर विश्वास नव्हता.