NC Times

NC Times

कोळगिरी सिद्धरेड्डी वस्ती येथे पत्रा शेडला अचानक लागलेल्या आगीत घर जळून खाक शेतकऱ्यांचा संसार आला उघड्यावर


नवचैतन्य टाईम्स माडग्याळ प्रतिनिधी(विजय चौगुले)-
कोळगिरी ता जत येथील अचानक लागलेल्या आगीत घरातील टीव्ही , फ्रिज , आणि दोन तोळे सोने , धान्य ,  संसारोपयोगी साहित्य जळून असे अडीच लाख रूपये नुकसान झाले आहे ही घटना जत  तालुक्यातील कोळगिरी येथील सिद्धरेड्डी वस्ती मधील शेतात घडली. या घटनेमुळे कष्टकरी शेतकऱ्यांचा संसार उघड्यावर आला आहे. 
शेतकऱ्यांचा संसार आला उघड्यावर 
जत तालुक्यातील कोळगिरी येथील श्री. शिवाजी लक्ष्मण बिराजदार  (45) हे आपल्या पत्नी व मुलासह राहत असून घरात  स्वयंपाक करत असताना  गुरुवारी  रोजी सकाळी 10 च्या सुमारास घराला अचानक आग लागली.  आग लागल्यानंतर  त्यांनी आपल्या पत्नी, सुन व मुलासह धाव घेत आगीवर पाण्याचा मारा केला. उन्हाची तीव्रता पाहता त्यांचे अफाट प्रयत्न कमी पडले. अन पाहता पाहता संपूर्ण घराची राख रांगोळी झाली. 
शैक्षणिक साहित्य, महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक 
आगीत शेतामधील काढलेला भुईमूग, कपडे, दोन तोळे सोने टीव्ही , फ्रिज , संसार उपयोगी साहित्य , मुलांचे शैक्षणिक साहित्य, महत्त्वाची कागदपत्रे, अंगावरील घरात ठेवलेल सोन आणि लोखंडाच्या पेटीत ठेवलेली रोख रक्कम 45 हजार रूपये जळून खाक  झाल्याने श्री. शिवाजी बिराजदार  यांचे जवळपास अडीच लाखाचे नुकसान झाले असून श्री. शिवाजी बिराजदार कुटुंबियांचा संसार उघड्यावर आला आहे. 
 आगीची माहिती मिळताच गावातील सरपंच श्री. आणेश हेळवी  यांनी ही माहिती तहसील प्रशासनास फोन द्वारे कळवून  सदरील घटनेचा पंचनामा कोळगिरी येथील तलाठी सौ.  कदम मॅडम यांनी केला.