NC Times

NC Times

१२ वी बोर्डाच्या परीक्षेत यंदाही मुलींची बाजी कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल


नवचैतन्य टाईम्स पुणे प्रतिनिधी(रावसाहेब काळे)-   महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, यंदा ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. यंदा १५ फेब्रुवारी ते २ एप्रिल या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली.
यंदा बारावी बोर्डाच्या परीक्षेस पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळातून विज्ञान, कला, वाणिज्य, व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय या शाखांसाठी एकूण १४,३३,३७१ नियमित विद्यार्थ्यंनाई नोंदणी केली होती. त्यापैकी १४,२३,९७० विद्यार्थी या परीक्षेकरता प्रविष्ट झाले होते. यातील १३,२९,६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यंदाच्या निकालाची एक्केवारी ९३.३७ एवढी आहे. तर मागील वर्षाच्या तुलने या टक्केवारीत २.१२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 सीबीएसई, आयसीएसईचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्य मंडळाच्या निकालाकडे विद्यार्थी पालकांचे लक्ष लागले होते.
 यंदाच्या HSC Result 2024 च्या निकालाची वैशिष्ट्ये :
१. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम या शाखांतील एकूण १४३३३७१ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४२३९७० विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १३२९६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आणि निकालाची टक्केवारी ९३.३७ आहे.
२. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ४५४४८ पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४५०८३ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी २२४६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण निकालाची टक्केवारी ४९.८२ आहे.
३. खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्याथ्र्यांची एकूण संख्या ४१४४८ एवढी असून ४०७९५ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून ३४९९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या निकालाची टक्केवारी ८५.७६ आहे.                 
४. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९७.५१%) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा (९१.९५%) आहे.
५.१२ वी बोर्डाच्या परीक्षेत यंदाही मुलींची बाजी कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल
६. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९७.५१%) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा (९१.९५%) आहे.
७. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींचा निकाल ९५.४४ % असून मुलांचा निकाल ९१.६० % आहे. म्हणजेच मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८४% ने जास्त आहे.
८. एकूण १५४ विषयांपैकी २६ विषयांचा निकाल १०० % आहे.
विभागनिहाय टक्केवारी
पुणे : ९३.४४ टक्के
नागपूर : ९२.१२ टक्के
छत्रपती संभाजीनगर : ९४.०८ टक्के
मुंबई : ९१.९५ टक्के
कोल्हापूर : ९४.२४ टक्के
अमरावती : ९३.०० टक्के
नाशिक : ९४.७१ टक्के
लातूर : ९२.३६ टक्के
कोकण : ९७.५१ टक्के