NC Times

NC Times

खरसुंडी येथील नळपाणी पुरवठा योजनेच्या मुख्य पाईपलाईला समांतर पाईप जोडून पाण्याची चोरी


नवचैतन्य टाईम्स आटपाडी प्रतिनिधी(राजू शेख)-  खरसुंडीच्या महाविराचा महाप्रताप आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथे नळ पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य पाईप लाईन ला समांतर पाईप जोडून पाण्याची चोरी करण्याचा प्रकार उजेडात आला आहे ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच धोंडीराम इंगवले व ग्रामसेवक पवन नंदकिशोर राऊत व सदस्य शफिक तांबोळी किरण पुजारी सुभाष माळी राहुल गुरव दिपक जाधव छगन साळूंके यांनी कारवाई करून सदर व्यक्ती सिध्देश्वर गजानन पुजारी (अलदरे) यांच्या वर शासकीय मालमत्तेचे नुकसान करून पाण्याची चोरी करून गावाला पाण्यापासून वंचित ठेवले असल्याने आरोपी सिध्देश्वर गजानन पुजारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 
खरसुंडी येथे हायस्कूल लगत असलेल्या पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या पाईपलाईन लगत नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम मागील आठवड्यात ग्रामपंचायत कडून सुरू होते परंतु हायस्कूल कडेला असणाऱ्या पाण्याच्या टाक्या अनेक दिवसापासून पूर्ण क्षमतेने भरण्यास विलंब लागत होता त्याचा परिणाम पुढील पाणीपुरवठा द्वारे होत होता त्याचे कारण मात्र कर्मचाऱ्यांना उलगडत नव्हते त्यातच पाईपलाईन टाकत असताना शेजारच्या पाईप मधून एक जादा पाईप जोडली असल्याची बाब कर्मचाऱी मधुकर भिसे व माऊली वाडेकर यांच्या निदर्शनास आली सदरचे पाइपलाइन खाजगी असून ती एका विहिरीत सोडण्यात आली होती ग्रामपंचायतचे पाणी सुरू केल्यानंतर या पाईपलाईन द्वारे पाणी थेट त्या खाजगी विहिरीत पडत असल्याचे सिद्ध झाले ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्याच्या मेन लाईनचे पाणी पूर्ण ताकतीने टाकीत येण्याऐवजी अशा प्रकारे पिण्याच्या पाण्याचे चोरी केलेल्या विहिरीत पडत होते आणि त्यावर शेती चांगल्या पद्धतीने भहरल्याचे पाहून ग्रामसेवकासह ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्यांनी हे सिद्धेश्वरा म्हणत घटनास्थळी डोक्याला हात लावला हा सर्व विषय लक्षात घेता खरसुंडी ग्रामपंचायत कडून सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला खरसुंडी ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांचे खरसुंडी ग्रामस्था कडून योग्य ती कारवाई केल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे