NC Times

NC Times

तम्मनगौडा रवीपाटील हेच भाजपचे विधानसभा उमेदवार जत तालुक्यातील भाजप नेते, पदाधिकाऱ्यांची भूमिका


नवचैतन्य टाईम्स माडग्याळ प्रतिनिधी(विजय चौगुले)-  
 भाजपचे विधानसभा निवडणूक प्रमुख व केंद्रीय रस्ते सुरक्षा बोर्डाचे संचालक तम्मनगौडा रवीपाटील हेच भाजपचे आमदारकीचे उमेदवार असतील त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत, अशी भूमिका जत तालुक्यातील भाजपचे विविध नेते व पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठकीत मांडली.
लोकसभा निवडणुकीपासूनच विधानसभा निवडणुकीच्या तयारीला कार्यकर्ते पदाधिकारी व इच्छुक मंडळी लागली आहेत. त्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील भाजपच्या विविध नेते पदाधिकाऱ्यांची बैठक आज येथील भाजप वार रूममध्ये झाली.  या बैठकीला शिवसेनेचे विधानसभा प्रमुख निवृत्ती शिंदे, जत नगरपालिकेचे माजी सभापती टीमुभाई एडके, सरपंच परिषदेचे माजी तालुकाध्यक्ष बसवराज पाटील, बाजचे माजी सरपंच संजय गडदे, भाजप शेतकरी आघाडीचे प्रमुख हणमंत गडदे, राजू पुजारी, आसंगी तुर्कचे सरपंच मिरासाहेब मुजावर, कुंभारीचे माजी उपसरपंच प्रदीप जाधव, जाडरबोबलादचे उपसरपंच प्रकाश काटे आदी उपस्थित होते.
निवृत्ती शिंदे म्हणाले की, जत तालुक्याला उच्चशिक्षित अभ्यासू व गल्लीपासून दिल्लीपर्यंत वजन असलेला नेता तम्मनगौडा रवीपाटील यांच्यासारखा आमदार गरजेचा आहे. रवीपाटील यांच्याकडे कोणतीही सत्तेची सूत्रे हातात नसताना थेट केंद्र सरकारच्या केंद्रीय रस्ते सुरक्षा बोर्डाच्या संचालक पदापर्यंत झेप घेतली आहे. जत तालुक्यातील दुष्काळाचा कलंक पुसून टाकण्याच्या दृष्टीने त्यांनी दमदार पाऊल टाकले आहे. आता जत तालुक्यावरील ऊस तोडणी मजुरांचा कलंक कायमचा पुसून टाकण्यासाठी जत तालुक्याचा कृषी व औद्योगिक विकास करण्याचा संकल्प तम्मनगौडा  रवीपाटील यांनी केला आहे. तालुक्यातील बेरोजगारी हटविण्याची धमक एकाच नेत्यांत आहे. आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.
टीमुभाई एडके म्हणाले की, एक बहुजन समाजातील नेता,  लिंगायत समाजाचा प्रतिनिधी म्हणून जत तालुक्यातील तळागाळापर्यंत त्यांनी आपल्या कार्याचा ठसा निर्माण केला आहे. जत शहरातील रस्ते, गटारी, सभामंडप यासाठी मोठा निधी दिला आहे. जत शहराचा पुढील ३५ वर्षांचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी तम्मनगौडा रवीपाटील प्रयत्नशील आहेत. आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अगोदरच रवि पाटील यांना उमेदवारीचा शब्द दिला आहे. आता फक्त औपचारिकता बाकी आहे.
बसवराज पाटील म्हणाले, जत तालुक्यात भाजपचे अनेक गट असताना,  विधानसभा निवडणूक प्रमुख पदाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. पक्षांची विस्कटलेली घडी बसविली. राज्यातील पहिली वार रूम स्थापन केली. वार रूंमच्या माध्यमातून तालुक्यात जोरदार पक्ष बांधणी केली आहे. मोदी @९ व नमो चषक केवळ तम्मनगौडा रवीपाटील यांच्यामुळे यशस्वी झाले व जत तालुक्यातील प्रत्येक घरोघरी हा उपक्रम पोहोचला. आता कोणी बाहेरच्यांनी जत तालुक्यात लुडबुड करू नये.
संजय गडदे म्हणाले, केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी 30 कोटी रुपये खर्चाचा बेदाणा प्रकल्प जत तालुक्यातील बालगाव येथे उभारला आहे. अंकलगी पाणी योजनेसारखी तीस कोटी रुपयांची महत्त्वकांक्षा पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली आहे. विस्तारित म्हैसाळ योजनेच्या कामाला गती येण्याच्यादृष्टीने व टेंडर निघण्यासाठी प्रयत्न केले आहेत. केंद्रीय मार्ग निधी तून अनेक रस्त्यांना केंद्र सरकारचा निधी मिळवून दिला आहे्  जत नगरपालिका,  विविध पाणीपुरवठा योजना, अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा खोल्या अशी चौफेर कामे केली आहेत.