NC Times

NC Times

श्री जोतिबा देवाच्या यात्रेचे औचित्य साधत लिंब शेरी येथे विविध कार्यक्रमाचे व उपक्रमाचे आयोजन

 
नवचैतन्य टाईम्स सातारा / कोरेगाव  प्रतिनिधी  :- ( राजेंद्र शेडगे  ) -सातारा तालुक्यातील लिंब या गावामधील शेरी विभागामध्ये हजारो भक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री ज्योतिबा देवाच्या यात्रेनिमित्त नवचैतन्य तरुण मंडळ शेरी यांच्या वतीने मर्दानी खेळ महाप्रसाद व शेतीविषयी जनजागृती अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . 

  नवचैतन्य तरुण मंडळ यांच्यावतीने शौर्य मर्दानी आखाडा सातारा या मुलांचा मर्दानी खेळ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते .  यामध्ये शेरी तसेच लिंबगावातील शाळेतील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळण्यासाठी अशा प्रकारचे खेळांचे आयोजन करण्यात आले होते. मर्दानी खेळाचे प्रत्यक्षित झाले नंतर उपस्थित असलेले मान्यवर आणि भागातील लोकांनी या मुलांचे कौतुक करून आभार मानले .  त्यानंतर शेरी भागातील युवा शेतकरी मुलांनी या विभागामध्ये " गावचं गाव पण जपणारी शेतकऱ्याची पोर आम्ही " या आशयाचे फलक घेऊन इतर  मुलांना शेतीविषयक आवड निर्माण व्हावी यासाठी प्रभात फेरी काढत जनजागृती केली  . यावेळी काही युवा प्रगतशील शेतकरी मुलांनी भागातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्या नंतर लिंब गावातील सर्व लोकांसाठी महाप्रसादाचे आयोजन नवचैतन्य तरुण मंडळ शेरी यांच्यावतीने करण्यात आले . लिंब परिसरातील शेकडो भावीकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला . 
 या कार्यक्रमाच्या वेळी माथाडी कामगार नेते गुलाबराव जगताप तसेच लिंब गावचे सुपुत्र उद्योजक केंब्रिज स्कूल ऑफ युनिव्हर्सिटी पुणे याचे सर्वेसर्वा धनंजय वर्णेकर हे उपस्थित होते . तसेच लिंबगावातील युवा शेतकरी युवकांनी तसेच नवचैतन्य तरुण मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला .