NC Times

NC Times

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक मॅनेजरवरील कारवाई नुसती धूळफेक मध्यरात्री कोणकोण होते ते तपासा- रोहित पवार


नवचैतन्य टाईम्स पुणे प्रतिनिधी(रावसाहेब काळे)- बारामती लोकसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी पहाटेपर्यंत बँक उघडी ठेवल्याप्रकरणी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी अर्थात पीडीसीसी बँकेच्या वेल्हा शाखेचे व्यवस्थापक विनायक ज्ञानोबा तलवडे यांना निलंबित करण्यात आलं आहे. मात्र, ही कारवाई धूळफेक असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वेल्हा शाखेतील मॅनेजरवर झालेली निलंबनाची कारवाई ही धूळफेक आहे. मध्यरात्री त्या शाखेत कोण कोण होते, कशासाठी होते, कुणाच्या सांगण्यावरून होते आणि काय व्यवहार झाले या सर्व गोष्टींची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होऊन कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. तसंच त्या रात्रीचं CCTV फुटेज सार्वजनिक झालं पाहिजे, अशी मागणी रोहित पवार यांनी 'एक्स'वरुन केली आहे.
बारामती मतदारसंघातील निवडणुकीत गैरप्रकार करण्यासाठी या बँकेतून पैसा गेल्याचा आमचा आरोप असून तसे अनेक व्हिडिओ मी उघड केले आहेत. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
रोहित पवारांनी मतदानाच्या दिवशी एक्सवर व्हिडिओ शेअर करत गंभीर आरोप केले होते. बँक मध्यरात्री एक वाजताही का सुरु ठेवली? असा सवाल विचारत बँकेतून पैसे वाटप होत असल्याचा आरोपही रोहित पवारांनी केला होता. बारामती लोकसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी पहाटेपर्यंत बँक उघडी ठेवल्याप्रकरणी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी अर्थात पीडीसीसी बँकेच्या वेल्हा शाखेचे व्यवस्थापक विनायक ज्ञानोबा तलवडे यांना निलंबित करण्यात आलं आहे. मात्र, ही कारवाई धूळफेक असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.पुणे जिल्हा मध्यवर्ती   बँकेच्या वेल्हा शाखेतील मॅनेजरवर झालेली निलंबनाची कारवाई ही धूळफेक आहे. मध्यरात्री त्या शाखेत कोण कोण होते, कशासाठी होते, कुणाच्या सांगण्यावरून होते आणि काय व्यवहार झाले या सर्व गोष्टींची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होऊन कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. तसंच त्या रात्रीचं CCTV फुटेज सार्वजनिक झालं पाहिजे, अशी मागणी रोहित पवार यांनी 'एक्स'वरुन केली आहे. बारामती मतदारसंघातील निवडणुकीत गैरप्रकार करण्यासाठी या बँकेतून पैसा गेल्याचा आमचा आरोप असून तसे अनेक व्हिडिओ मी उघड केले आहेत. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. रोहित पवारांनी मतदानाच्या दिवशी एक्सवर व्हिडिओ शेअर करत गंभीर आरोप केले होते. बँक मध्यरात्री एक वाजताही का सुरु ठेवली? असा सवाल विचारत बँकेतून पैसे वाटप होत असल्याचा आरोपही रोहित पवारांनी केला होता. दरम्यान, पीडीसीसी बँकेची वेल्हे शाखा पहाटेपर्यंत सुरु ठेवल्याने मॅनेजर विनायक तेलवडे यांना निलंबित करण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशावरुन या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पुणे जिल्हा मध्यवर्ती   बँकेची वेल्हे शाखा पहाटेपर्यंत सुरु ठेवल्याने मॅनेजर विनायक तेलवडे यांना निलंबित करण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशावरुन या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.