NC Times

NC Times

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांचा पाच दिवसीय महाबळेश्वर दौरा


नवचैतन्य टाईम्स सातारा प्रतिनिधी(शरद झावरे)-प्रथेप्रमाणे २१ मे पासून २५ मे पर्यंत राज्यपालांचा महाबळेश्वर दौरा असणार असून जिल्हा प्रशासनाकडून याची तयारी सुरु आहे येतील राजभवनात त्या अनुषंगाने युध्दपातळी  सर्व तयारी करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दोनच दिवसांपूर्वी राज्यपाल दौऱ्याच्या अनुषंगाने बैठक घेत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आहे, अशी माहिती मिळाली. पालिका प्रशासक योगेश पाटील व पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी राज्यपाल दौरा व उन्हाळी हंगामामध्ये होणारी वाहतूक कोंडी या अनुषंगाने वेण्णा लेक परिसराची पाहणी करून गरज असेल त्या ठिकाणी बॅरिगेटस उभारणीसह वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेत सूचना केल्या. यावेळी पालिकेचे मुख्य लिपिक आबाजी ढोबळे, एम. आर. धायगुडे, पोलीस उपनिरीक्षक रौफ इनामदार, नवनाथ शिंदे आदी उपस्थित होते.