NC Times

NC Times

उन्हाळ्याच्या सुट्टीत राज्यपाल महाबळेश्वरच्या दौऱ्यावर


नवचैतन्य टाईम्स  सातारा जिल्हा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे)- महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस हे २१ मेपासून २५ मेपर्यंत पाच दिवस महाबळेश्‍वर दौऱ्यावर आले आहेत. त्यांचा राजभवन महाबळेश्वर येथेच मुक्काम असून विशेष म्हणजे उन्हाळा सुट्टीतच महाबळेश्वरला महाराष्ट्राचे राज्यपाल का येतात! हा जनतेला कुतूहलाचा नेहमीच प्रश्न उभा राहिलेला असतो.
 महाराष्ट्रातील महाबळेश्वर हे सह्याद्रीच्या पर्वत रांगांवर समुद्रसपाटीपासून सुमारे ४५०० फूट उंचीवर वसलेले थंड हवेचे ठिकाण. महाबळेश्वरला जुन्या मुंबई प्रांताची उन्हाळ्यातील राजधानी म्हणूनच संबोधले जात होत. येथील हिरवा निसर्ग, सुंदर बगीचे, उद्याने, श्वास रोखायला लावणारी दृश्ये इत्यादीमुळे पर्यटक मंत्रमुग्ध होत असतात.
ब्रिटीशकालीन वैभवसंपन्न आणि मनमोहक वाडे, इमारती आजही त्यावेळच्या ब्रिटीश राजवटीची ओळख करून देतात. मार्च ते जून हा कालावधी महाबळेश्वरला भेट देण्यास योग्य ठरतो. मुंबईच्या खारी आणि दमट हवामानातून सुटका होण्यासाठी तसेच शहरापासून दूरवर निसर्गरम्य वातावरणात प्राकृतिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी गव्हर्नर येथे येत असत.
 सन १८१९ मध्ये ब्रिटिशांनी सर्व डोंगरी भाग सातारचे राजे यांच्या छत्राखाली आणला. कर्नल लॉडविक हे सातारचे स्थानिक अधिकारी होते. सन १८२८ पासून सर जॉन मॅल्कॅम, सर माऊंट स्टुअर्ट एल्फिंस्टन, आर्थर मॅलेट, करणक, फ्रेरे यांनी भेटी दिल्या आहेत.
 महाबळेश्वरची ओळख १९२९-३० मध्ये झाली. त्यापूर्वी ते माल्कम पेठ नावाने ओळखल जात. आता ते महाबळेश्वर नावाने ओळखल जात. महाबळेश्वर येथे “राज भवन” हे उन्हाळ्यात महाराष्ट्राच्या राज्यपालांसाठी निवासस्थान आहे. ते दि टेरेसेस नावाच्या जुन्या इमारतीत आहे. तिची खरेदी १८८४ मध्ये करण्यात आली आहे.
महाबळेश्वर येथे ब्रिटिश राजवटीत मुंबईच्या गव्हर्नरची उन्हाळी निवासस्थाने राहिलीय. गव्हर्नरचे महाबळेश्वर येथील निवासस्थान पूर्वी ‘टेरेसेस’ या नावाने ओळखले जायच. कालांतराने त्याचे नाव ‘गिरी दर्शन’ असे झाल. हे निवासस्थान लहान असल तरी टुमदार आहे.
पूर्वी गव्हर्नर आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राज्यपाल या ठिकाणी उन्हाळ्यातील काही आठवडे राहत व तेथूनच शेजारच्या जिल्ह्यांना भेट देऊन विकासकामांची पाहणी तसेच सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावत.
 टेरेसेस’ हा बंगला सन १८८४ साली खरेदी केला होता. त्यानंतर सन १८८६ साली त्याचा गव्हर्मेंट हाउस मालमत्तेमध्ये समावेश करण्यात आला. सन १९३२ साली गव्हर्नर यांचे पूर्वीचे निवासस्थान असलेला ‘बेला व्हिस्टा’चा बंगल्याचा वापर बंद करून त्या ऐवजी ‘टेरेसेस’ हा बंगला अधिकृत निवासासाठी वापरण्यात येऊ लागल.
 थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर येथे उन्हाळ्याच्या सुटीसाठी राज्यपाल हे दरवर्षी येतात. 25 मेदरम्यान राज्यपाल रमेश बैस महाबळेश्वर मुक्कामी असणार आहेत. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी राजभवन येथील सुरक्षेची व्यवस्था चोख ठेवली आहे.