NC Times

NC Times

पाणी पिणाऱ्या हत्तीवर मगरीनं केला हल्ला, सोंड पकडून पाडलं खाली, शेवटी मृत्यूच्या खेळात कोण जिंकलं?

 
जंगलात जिवंत राहणं सोपं काम नाही. कारण कधी कुठून हल्ला होईल सांगता येत नाही. अगदी पाणी पिताना सुद्धा सावध राहावं लागतं. कारण शिकारी पाण्यात सुद्धा दबा धरून बसलेले असतात. याच पार्श्वभूमीवर हत्ती आणि मगरीमध्ये झालेल्या लढाईचा व्हिडीओ समोर आला आहे. तर त्याचं झालं असं की, हत्तींचा कळप नदी किनारी पाणी पित होता. खरं तर सर्वच हत्ती सावधपणे पाणी पीत होते. पण या नदीमध्ये एक मगर दबा धरून बसली होती. दरम्यान संधी मिळताच तिनं एका हत्तीच्या पिल्लावर हल्ला केला. त्या हत्तीची सोंड पकडून मगरीनं त्याला खाली खेचलं. आणि पुढे या लढाईत काय झालं हे आता तुम्हीच पाहा. या व्हिडीओचा शेवट पाहून तुम्ही देखील अवाक् व्हाल.

शेवटी या लढाईत कोण जिंकेल?


मगर ही पाण्यात लपून बसते आणि संधी मिळताच जोरदार हल्ला चढवते. तिचे दात इतके अणकूचीदार असतात की एका फटक्यात ती समोरच्या प्राण्याचे दोन तुकडे करू शकते. त्यामुळेच मगरीला पाण्यातला राक्षस असं देखील म्हटलं जातं. यावेळी मगरीनं हत्तीच्या पिल्लावर हल्ला केला. पण हल्ला करणं तिला चांगलंच महागात पडलं. कारण या पिल्लासोबत त्याचं अख्खं कुटुंब होतं. हल्ला करताच दुसऱ्या मोठ्या हत्तीनं मगरीच्या पाठीवर पाय दिला. अचानक अंगावर वजन पडल्यामुळे मगरीची पकड सैल झाली अन् अखेर ते पिल्लू मगरीच्या तावडीतून सुटलं. मग बाकीचे हत्ती सुद्धा आपला जीव वाचवून पळू लागले. 
 हा व्हिडीओ होतोय व्हायरल

मगरीचा हल्ला गेला निकामी
हा व्हिडीओ Latest Sightings या युट्यूब अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ १४ लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून जवळपास सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे. कारण मगरीचा हल्ला हा जबरदस्त असतो पण हत्तीनं ३ सेकंदात त्या मगरीचं काम तमाम केलं. असो, तुम्हाला काय वाटतं जर या मगरीनं पुन्हा एकदा हल्ला केला असता तर हत्तीची शिकार झाली असती का? (फोटो सौजन्य - Latest Sightings/Youtube)