NC Times

NC Times

वडिलोपार्जित संपत्तीवर मुलाइतकाच मुलीचाही अधिकार


नवचैतन्य टाईम्स नवी दिल्ली (प्रतिनिधी)  कौटुंबिक नातेसंबंधात विविध भूमिका बजावणाऱ्या महिलेला घटनात्मक किंवा कायदेशीर अधिकारांची माहितीच नसते. हक्काच्या दृष्टीने घरातील कर्ता पुरुष जे सांगेल तेच स्वीकारायचं असं आजची अनेक महिलांना लहानपणापासूनच शिकवले आणि वागवले जाते. समाजातील अनेक स्त्रियांना आजही त्यांचा हक्क मिळालेला नाही. भारतीय कायद्यानुसार मुलींना मुलांप्रमाणेच वाई-वडिलांच्या मालमत्तेत मुलांइतकेच समान अधिकार देण्यात आले आहेत. हिंदू अधिकार कायद्याच्या अनुसूचीनुसार मुलगी आणि मुलगा दोघेच क्लास 1 चे वारसदार आहे आणि त्यांना समान वाटा मिळतो.
 लग्नानंतर मुलीचे मालमत्तेवरील हक्क, मुलीला मालमत्ता किंवा इच्छापत्रातून बेदखल करता येईल का, वडिलोपार्जित मालमत्तेवर महिलेचे अधिकार काय, मुलगा किंवा मुलीचा वाटा कसा ठरवला जातो, वडिलांनी मृत्युपत्र तयार केले नसेल तर काय होईल?
लग्नानंतर मुलीच्या संपत्तीच्या अधिकाराबाबत कायदा
न्यूज18 मध्ये प्रसिद्ध अहवालानुसार सर्वोच्च न्यायालायातील प्रॅक्टिसिंग वकील आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) माजी सदस्य डॉ. चारू वलिखन्ना यांच्या नुसार जर एखाद्या मुलीचे लग्न झाले आणि तिला हुंडा किंवा स्त्रीधन इत्यादी गोष्टी दिल्या तर समाजात हे मान्य केले जाते. अशा प्रकरणात महिला वडिलांच्या मालमत्तेमध्ये हक्क मागू शकत नाही. पण कायदा हे मान्य करत नाही आणि वडिलांच्या मालमत्तेत मुलीलाही मुलाइतकाच हक्क आहे. चारू म्हणतात, जर मुलीचे लग्न झाले तर लग्नावर तिचा किंवा मुलाचा हक्क संपत नाही. मुलगा आणि मुलगी दोघेही पहिल्या फळीचे वारस मानले जातात.
 मुलगा किंवा मुलीला होऊ शकते बेदखल...
हिंदू उत्तराधिकार (सुधारणा) कायदा, २००५ नुसार इच्छापत्र नसले तर मुलीला मुलाप्रमाणे समान अधिकार आहेत. पण मृत्युपत्र करणाऱ्याला आपल्या इच्छेनुसार मालमत्तेचे मृत्यूपत्र करण्याचा पूर्ण अधिकार आहे. अशा परिस्थितीत आई-वडिलांनी मुलाला मालमत्तेवर हक्क देत मुलीला बेदखल केल्याचेही दिसून आले आहे.
वडिलोपार्जित आणि स्वतः कमावलेल्या मालमत्तेवर हक्क आहे की नाही?
यापूर्वी हिंदू उत्तराधिकार दुरुस्ती कायदा २००५ मध्ये येणाऱ्या ‘स्त्रियांच्या संपत्तीचा वारसा’ अंतर्गत अधिकारांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले होते. कायद्यांतर्गत, कलम ६ मधील तरतुदींमध्ये सुधारणा करण्यात आली असून महिलांना मुलाप्रमाणे समान Co-parcenary अधिकार मिळू शकतात आणि वडिलांच्या वडिलोपार्जित आणि स्वतःहून उभारलेल्या मालमत्तेचे विभाजन आणि ताब्यात घेण्याचा दावा करू शकते.
मृत्यूपत्र न करता वडिलांच्या मृत्यूनंतर...
लक्षात घ्या की इच्छापत्र लिहून आणि मृत्यूपत्र न करता वडिलांचे निधन होणे हे कायद्यातील दोन भिन्न परिस्थितीत आहेत. मृत्युपत्र असेल तर त्यानुसार मुला-मुलीला हक्क दिला जाईल पण मृत्युपत्र नाही आणि कुटुंब प्रमुख म्हणजे वडील किंवा पतीचे निधन झाले तर वारस म्हणून मुलीचा समान अधिकार आहे. तर विधवा पत्नीला संपत्तीवर कोणाला हक्क द्यायचा आहे हे संपूर्णपणे तिच्यावर अवलंबून आहे.