NC Times

NC Times

संख येथे छप्पर वजा पत्र्याचे घर आगीत भस्मसात कुटुंब पडले उघड्यावर अंदाजे दहा लाखाचे नुकसान


नवचैतन्य टाईम्स  माडग्याळ प्रतिनिधी(विजय चौगुले)- मौजे संख तालुका जत  येथील साहेबगौडा शिवाप्पा बिरादार (वय ५९) यांच्या छप्पर वजा पत्र्याच्या घराला अचानकपणे आग लागून दहा लाखाचा नुकसान झाले आहे.
 संख पासून चार किलोमीटर अंतरावर साहेबगौडा शिवाप्पा बिरादार यांची वस्ती आहे. सकाळी सर्वजण शेतात गेले होते. घरात कोणीही नव्हते . साडेअकरा वाजन्याच्या सुमारास अचानकपणे राहत्या छप्परला आग लागली. छप्परात धुर पाहून पळत येऊन पाहिले असता सगळीकडे आगिने रुद्र रूप धारण केले होते आग विजविण्याचा प्रयत्न केला परंतु आग आटोक्यात आली नाही.या आगीत रोख ७०हजार रुपये व ७० ग्रॅम सोने ५ लाख 10हजार रूपये, १४ ग्रॅम चांदी १२हजार 200रुपये व लहान मुलांचे दागिने तसेच ७० हजारचा लॅपटॉप,८५ हजार चे कॅम्पुटर व दोन मोबाईल ३०हजार, असे एकूण ९लाख९८हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.
 तसेच घरातील  प्रकल्पग्रस्त दाखल, शाळेचे सर्व कागदपत्रे, रेशन कार्ड , धान्य, संसार उपयोगी  साहित्य ,भांडी,  कपडे ,वस्तू जळून सुमारे दहा लाखाचे नुकसान झाले  आहे.
 बिराजदार कुटुंब उघड्यावर पडले असून निराधार  झाले आहे.शासनाने आपतग्रस्त निधीतून मदत मिळावी अशी मागणी बिराजदार कुटुंबाकडून होत आहे.
घटनेची माहिती गाव कामगार तलाठी विनायक भालटे यांना मिळाल्याने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.