NC Times

NC Times

हुशारी असावी तर अशी! मगरींनी रस्ता अडवताच तरुणानं लावलं असं डोकं,

 
मगर ही अत्यंत खतरनाक शिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते. कारण तिचा हल्ला इतका जोरदार असतो की ती एका फटक्यात समोरच्या प्राण्याचे दोन तुकडे करू शकते. बरं, ती दिसायला सुस्त वाटत असली तरी शिकार करताना मात्र विजेच्या वेगानं हल्ला करते. त्यामुळे समोरच्या प्राण्याला प्रतिहल्ला करण्याची सुद्धा संधी मिळत नाही. आता विचार करा रस्त्यानं जात असताना इतक्या खतरनाक शिकाऱ्यानं तुमचा रस्ता अडवला तर तुम्ही काय कराल? होय असाच काहीसा प्रकार एका तरुणासोबत घडला. सायकल चालवत असताना चक्क दोन महाकाय मगरींनी त्याला अडवलं. या मगरी त्याला पुढे जाऊच देत नव्हत्या. बरं, मगर काही कुत्रा-मांजर नाही दोन दगड मारले की पळून जायला. शेवटी या तरुणानं मगरींच्या तावडीतून सुटण्यासाठी पाहा कशी शक्कल लढवली? या व्हिडीओचा शेवट पाहून तुम्ही सुद्धा थक्कच व्हाल. (फोटो सौजन्य - ViralHog/youtube.com)
 हा व्हिडीओ ViralHog या युट्यूब चॅनेलवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. सायकल चालवत असाताना दोन मगरींनी तरुणाचा रस्ता अडवला. या मगरी रस्त्यामध्येच झोपून होत्या. जणू एखादा गुंड लोकांना लुबाडण्यासाठी रस्ता अडवतो अगदी त्याच प्रमाणे त्यांनी या तरुणाकडे पाहिलं. पण हा तरुण सुद्धा धाडसी दिसतोय. त्यानं काहीच हालचाल केली नाही. उलट तो आपल्या जागीच उभा राहिले. मग थोड्या वेळानं मगरी स्वत:हूनच रस्त्याच्या कडेला गेल्या अन् संधी मिळताच त्या मुलानं पळ काढला.
 ही संपूर्ण घटना त्यानं आपल्या हेल्मेट कॅमेरामध्ये शूट केली अन् आता हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या मगरी बहूदा पोटभर खाऊन उन्हात आराम करत बसल्या होत्या. त्यामुळेच त्यांनी या तरुणावर हल्ला केला नाही. अन्यथा इतकी जवळ उभी असलेली शिकार मगर काही सोडत नाही. हा व्हिडीओ ४७ हजारांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून जवळपास सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं आहे. कारण मगरींपासून वाचणं खरंच साधी गोष्ट नाही. असो, तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया द्या.