NC Times

NC Times

वर आकाश, खाली समुद्र, हवेतच बंद झालेलं विमानाचं इंजिन; मृत्यूला 'टाटा' करुन परतले टाटा


नवचैतन्य टाईम्स मुंबई प्रतिनिधी (नेहाल हसन)- देशातील सर्वात प्रतिष्ठित उद्योगपतींपैकी एक टाटा समूहाचे अध्यक्ष अमिरेट्स रतन टाटा व्यावसायिक ज्ञान आणि सेवाभावी कार्यासाठी ओळखले जातात. देशभरात टाटांचे कोट्यवधी चाहते आहेत जे त्यांच्याकडून प्रेरणा घेतात. सध्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाटांशी संबंधित एका घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे. ‘फिगरिंग आउट विथ राज शामनी’ या पॉडकास्टवर बोलताना एअरसेलचे संस्थापन सी. शिवशंकरन यांनी रतन टाटांनी जवळून अनुभवलेल्या मृत्यूचा किस्सा सांगितला.
रतन टाटांनी जवळून पहिला मृत्यू
शिवशंकरन म्हणाले की रतन टाटांसोबत एअर इंडियाच्या फ्लाइटमधून प्रवास करत होते तेव्हा अचानक विमानाच्या एका इंजिनमध्ये बिघाड झाला. शिवशंकरन यांनी पॉडकास्टमध्ये म्हटले की ‘रतन टाटा आणि मी सिंगापुरहून सेशेल्सच्या फ्लाइटमध्ये होतो. आम्हाला कळले की विमानाचे एका इंजिनमध्ये बिघाड झाला आहे.’ रतन टाटांच्या सचिवाने सांगितले की दुसरे इंजिनही बिघडले तर विमान ३० मिनिटांत कोसळू शकते.
 शिवशंकरन घाबरले पण रतन टाटा म्हणाले...
एअरसेलचे संस्थापक शिवशंकरन यांनी सांगितले की, जेव्हा मला वाटले की मृत्यू जवळ आला आहे, तेव्हा मी माझ्या मुलाला एक ईमेल पाठवला. यामध्ये त्यांनी मुलासोबत जीमेल पासवर्ड शेअर केला तर याउलट रतन टाटा यांनी संयम राखला आणि सल्ला दिला - ‘वैमानिकांना त्यांचे काम करू द्या.’ रतन टाटा यांच्याकडे पायलट प्रमाणपत्र असून एफ-16 फाल्कन फायटर जेट उडवणारे ते पहिले भारतीय होते. जेआरडींप्रमाणेच रतन टाटा एक उत्कट स्थिर विंग पायलट असून परवानाधारक पायलट आहेत ज्यांनी अनेकदा वैयक्तिकरित्या कंपनीचे डसॉल्ट फाल्कन 2000 बिझनेस जेट उडवले. परंतु कारकिर्दीच्या एका वळणावर त्यांनी जवळून मृत्यूचा अनुभवी घेतला आहे.
 याशिवाय रतन टाटा यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलताना शिवशंकरान यांनी टाटा समूहाच्या माजी अध्यक्षांच्या निःस्वार्थ देशभक्तीची प्रशंसा केली. त्यांनी म्हटले की रतन टाटा सर्व गुणांनी युक्त व्यक्ती आहेत. ते नेहमीच उत्कृष्ट आणि राष्ट्राच्या कल्याणाला प्राधान्य देतात.
लाइमलाइटपासून दूर राहणारं घराणं
रतन टाटा यांच्या आयुष्यातील कधी न ऐकलेले किस्से ऐकण्यासाठी लोकांमध्ये नेहमीच उत्साह असतो. रतन टाटा आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल फारच कमी माहिती लोकांमध्ये उघड करण्यात आली आहे. याशिवाय टाटा कुटुंब लाइमलाइटपासून दूर राहतात त्यामुळेच त्यांच्याबद्दल कधीही न असेलेले किस्से ऐकायला लोकांमध्ये रस पाहायला मिळतो.