NC Times

NC Times

तरुणानं कशी दिली बिबट्याला टक्कर,ताकत अंगात नाही तर काळजात असली पाहिजे


बिबट्या हा सर्वात खतरनाक शिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. किंबहूना तो वाघ-सिंहापेक्षाही जास्त खतरनाक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण हे प्राणी फक्त जंगलात शिकार करतात. पण बिबट्या तर पार लोकांच्या घरात शिरून माणसं उचलून नेतो. असाच एक बिबट्या शिकार करण्याच्या उद्देशानं शेतात शिरला होता. पण शिकार करण्याआधीच त्याचा सामना एका धाडसी तरुणाशी झाला. या तरुणानं बिबट्यासोबत अशी फाईट केली की जी पाहून तुम्ही देखील अवाक् व्हाल. ते म्हणतात ना, जिथे भय संपतं तिथं आयुष्य सुरू होतं. होय, याचिच प्रचिती तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लक्षात येईल  - motivational.fire_1m/Instagram)
 तर त्याचं झालं असं की, हा बिबट्या शिकार करण्याच्या उद्देशानं झुडपांमध्ये लपून बसला होता. शेतात काम करणाऱ्या लोकांवर हल्ला करायचा असा त्याचा बेत होता. अन्, संधी मिळताच त्यानं हल्ला केला देखील. पण यावेळी त्याचा अंदाज चुकला. कारण त्याचा सामना एका निधड्या छातीच्या धाडसी तरुणासोबत झाला. या तरुणानं बिबट्याचे हात आणि पाय अशा पद्धतीनं धरून ठेवले की त्याला हालचाल करणं देखील कठीण जात होतं. अन् मग त्याचे इतर साथीदार धावत आले अन् त्यांनी या बिबट्यावर काठीनं हल्ला करून त्याचा उर्वरीत प्रतिकार सुद्धा संपवून टाकला.
हा व्हिडीओ motivational.fire_1m या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्याता आला आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ हजारो नेटकऱ्यांनी पाहिला असून अनेकांनी त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी तरुणाचं धाडस पाहून त्याचं कौतुक करतेय, तर कोणी या बिबट्याचं पुढे काय झालं? असा सवाल करतेय. असो, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या डोक्यात कुठले विचार आले? तुम्ही देखील आपल्या गंमतीशीर प्रतिक्रिया नक्की द्या.