NC Times

NC Times

​कॉलेज गर्लच्या सैराट, चोली के पिछे गाण्यावर केला खतरनाक डान्स धम्माल व्हिडीओ व्हायरल


सोशल मीडियावर सध्या ‘क्रू’ या चित्रपटातील ‘चोली के पिछे क्या है’ हे गाणं प्रचंड ट्रेंडिंगमध्ये आहे. इन्स्टाग्राम, फेसबुक, युट्यूब कुठलंही सोशल मीडिया ॲप सुरू करा, दर दोन व्हिडीओंमागे तुम्हाला किमान एक रील याच गाण्यावर पाहायला मिळेल. याच पार्श्वभूमीवर एका कॉलेज तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या तरुणीनं या गाण्यावर धम्माल डान्स केलाय. लक्षवेधी बाब म्हणजे हा डान्स इतका तुफान व्हायरल होतोय की काही तासांत ३० लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहिलाय. दरम्यान काहींनी तर या तरुणीची तुलना थेट करिना कपूरशी केलीये. हा डान्स तुम्ही देखील पाहा, अन् सांगा तुम्हाला हा डान्स कसा वाटला?
हे पाहा तरुणीनं असा केलाय डान्स https://x.com/JokerOf_India/status/1785409924274516070
 हा व्हिडीओ @divya_gandotra या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार तरुणीनं हा डान्स कॉलेजच्या फ्रेशर्स पार्टीमध्ये केलाय. आता हे कॉलेज नेमकं कोणतं आहे? याबद्दल अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण हा डान्स सोशल मीडियावर मात्र धम्माल करताना दिसतोय. हा व्हिडीओ आतापर्यंत ३० लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून जवळपास सर्वांनीच या तरुणीचं कौतुक केलंय. काहींनी तर तिची तुलना बॉलिवूड अभिनेत्रींशी सुद्धा केलीये. म्हणतायेत, ही तर त्यांच्यापेक्षाही भारी डान्स करतेय. तर काहींना अशा प्रकारचे डान्स कॉलेजमध्ये करणं योग्य वाटत नाहिये. असो, हा डान्स पाहिल्यानंतर तुमच्या डोक्यात कुठले विचार आले? अन् तुम्ही सुद्धा आपल्या कॉलेजच्या काळात असे धम्माल डान्स परफॉर्मंस कधी दिले आहेत का? आपल्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की द्या.