NC Times

NC Times

कवठेमहांकाळ मध्ये श्री शिवचिदंबर मंदिराचा द्वितीय वर्धापनदिन विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे)-कवठेमहांकाळ शहरातील कमंडलू नदीच्या नजीक असणार्या श्री‌क्षेत्र शिवचिदंबर महास्वामी मंदिराचा द्वितीय वर्धापनदिन सोहळा हा विविध कार्यक्रमांसह मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्या निमित्ताने शुक्रवार दिनांक १० मे पासून विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.हा संपूर्ण सोहळा समितीचे सर्वास्वा चिदंबरदास गुरु गोविंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
यानिमित्ताने शुक्रवार दिनांक १०‌ मे ते रविवार दिनांक १२ मे यादरम्याने दररोज काकड,भजन,किर्तन,आरती,जागर सह    विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम कार्यक्रम पार पडले.शुक्रवार दिनांक १० मे रोजी सायंकाळी ६ ते रात्री ८ यावेळेत झी टॉकीज फेम हभप अनिल महाराज (तडवळेकर) यांचे किर्तन झाले.शनिवार दिनांक ११ मे रोजी सायंकाळी ६ ते रात्री ८ यावेळेत झी टॉकीज फेम युवा किर्तनकार हभप हणमंत महाराज (आटपाडकर) यांचे किर्तन पार पडले.तर रविवार दिनांक १२ मे रोजी सकाळी भागवताचार्य हभप प्रेमानंद महाराज शास्त्री यांचे काल्याचे किर्तन होऊन पुष्पवृष्टी करण्यात आली.या कार्यक्रमा दरम्याने कवठेमहांकाळ, मणेराजुरी,दरीबडची येथील भजनी मंडळाचा जागरही पार पडला.कार्यक्रमाची सांगता ही दुपारी ४ वाजता निघालेल्या सुवाद्यासह फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य दिव्य अश्या पालखी मिरवणूकीने झाली.हाती,घोडे,उंट हे या मिरवणुक सोहळ्याचे मुख्य आकर्षण होते.
      या सोहळ्याच्या निमीत्ताने मंदिर परिसरात भव्य मंडप व सामिना उभारण्यात आला होता.तर मंदिर परिसरात केलेली आकर्षक अशी विद्युत रोषणाई तर सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती.तसेच याच‌‌ दिवसी दुपारी १२ ते रात्री ९ यावेळेत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.याचा लाभ तमाम भाविक भक्तांनी घेतला.गेली चार दिवसांपासून श्रीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती.हा संपूर्ण सोहळा हा चिदंबरदास गुरु गोविंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.