NC Times

NC Times

उन्हाचा कडाका वाढला! उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ


नवचैतन्य टाईम्स   पुणे प्रतिनिधी(रावसाहेब काळे)-राज्यात उन्हाचा पारा वाढत असल्याने उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. गेल्या नऊ दिवसांमध्ये उष्माघाताच्या १८ रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत राज्यात २०२ रुग्ण आढळले असून, त्यातील सर्वाधिक रुग्ण एप्रिल महिन्यात आढळून आले आहे.
 मार्चमध्ये ४० तर एप्रिलपर्यंत एकूण १४० रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे काळजी घेण्याचा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे. मार्चपासून तापमान वाढण्यास सुरुवात होते. त्यामुळे आरोग्या विभागातर्फे दर वर्षी एक मार्चपासून उष्माघाताच्या रुग्णांची नोंद केली जाते. आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण नाशिक, बुलढाणा, जालना, नाशिक, धुळे आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये आढळून आले आहे.
 सर्वाधिक रुग्ण आढळून आलेले जिल्हे (१ मार्च ते ५ मे )
 बुलढाणा : २०

- धुळे : २०

- जालना : २०

- नाशिक : २३

- सोलापूर : १८
उष्माघाताचे रुग्ण कसे ओळखावे, कोणते उपचार द्यावे या बाबतचे प्रशिक्षण वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. उष्णतेपासून होणाऱ्या आजारांबाबत सर्वेक्षण करण्यात येत आहे.

- डॉ. राधाकिशन पवार, आरोग्य विभागाचे सहसंचालक