NC Times

NC Times

कवठेमहांकाळमध्ये भव्य रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य तपासणी शिबिर

 
नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):- दुर्वा कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा व सामाजिक कार्यकर्ते जगन्नाथ (दादा) शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या गणेश नगर कवठेमहांकाळ येथे भव्य रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले असल्याची माहिती स्वतः जगन्नाथ शिंदे यांनी दिली.
याबाबत बोलताना जगन्नाथ शिंदे म्हणाले की उद्या गणेश नगर येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले असून त्याचबरोबर ताराबाई परांजपे आय बँक ट्रस्ट ॲन्ड रिसर्च फाउंडेशन सांगली यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर  ही होणार आहे.
तसेच मोफत आरोग्य तपासणी शिबिरही होणार आहे यामध्ये ह्रदयविकार,बायपास,मेंदू विकार त्याचबरोबर बीपी, शुगर,कोलोस्टेरॉल यांसारख्या विविध आजाराच्या तपासणी व आवश्यक असल्यास शस्त्रक्रिया केली जाणार आहे.त्याचबरोबर आयुर्वेदिक उपचारही येथे होणार आहेत.तरी यांचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.