NC Times

NC Times

घाटनांद्रे येथील श्री सिध्दनाथ देवाच्या यात्रेची उत्साही सांगता


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे) :- 'सिध्दनाथाच्या नावानं चांगभलं' च्या गजरात,गुलाल खोबर्याच्या उधळणीत व भव्य दिव्य अश्या पालखी मिरवणूकीने घाटनांद्रे (ता कवठेमहांकाळ) येथील श्री सिद्धनाथ देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.यानिमीताने भाविकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 शुक्रवार दिनांक १० मे रोजी श्रीचा नैवेद्य व बोणी पार पडली.यादीवसी अगदी पहाटे पाच वाजता श्रीची पुजाअर्चा करून अभिषेक करण्यात आला.तदनंतर अगदी सकाळ पासूनच देवाच्या दर्शनासाठी भाविकभक्तांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती.तर‌ यादिवशी सकाळी दहानंतर देवाच्या भांगेचे वाटप करण्यात आले तर संध्याकाळ नंतर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात शोभेच्या दारूची आतिषबाजी करण्यात आली.
तर शनिवार दिनांक ११ मे हा यात्रेचा मुख्य दिवस होता.सदर दिवसी सकाळी नऊ वाजता मंदिरा पासून सुवाद्यासह गुलाल खोबर्याच्या उधळणीत व फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्यदिव्य अश्या पालखी मिरवणूकीला सुरुवात करण्यात आली.सदर पालखी मिरवणूक गावातील प्रमुख मार्गावरून फिरुन परत मंदिर परिसरात आणण्यात आली.याच दरम्याने सकाळी १० ते दुपारी ४ यावेळेत वगसम्राज्ञी कु कमल-अनिता कराडकर यांचा लोकनाट्याचा तमाशाचा कार्यक्रम पार पडला.यालाही तमाशा रसिकांनी चांगलीच दाद दिली.तदनंतर महाप्रसाद वाटप करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यात्रे निमित्ताने पाळणेवाले,खेळणीवाले,मिठाईवाले व व्यापारीवर्गांची मोठी रेलचेल दिसून येत होती.सलग दोन दिवस भाविक भक्तांनी श्रीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.यात्रेनिमीताने येणार्या यात्रेकरुसाठी गुरुकृपा ऑक्वाचे शहाजी शिंदे यांनी मोफत शुध्द व थंड पाण्याची व्यवस्था केली होती.याबाबत यात्रेकरू कडून समाधान व्यक्त केले जात होते.