NC Times

NC Times

योग्य आहार देईल थायरॉईड पासून सुटका...


नवचैतन्य टाईम्स सातारा जिल्हा प्रतिनिधी(डॉ.अरुण राजपुरे)- आज आपण थायरॉईड झाल्यावर काय काय आहार घ्यावा ते पाहूया.... आजकाल वजन वाढायला लागले की डॉक्टर थायरॉईडची तपासणी करण्याचा सल्ला देतात हो कारण अचानक वाढणाऱ्या वजनाच्या मुळाशी थायरॉईड असू शकते. बिघडलेल्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये याचे प्रमाण जास्त आढळते. पण घाबरू नका योग्य आहार तुमचे या आजारापासून रक्षण करू शकतो.                            बरं हे थायरॉईड प्रकरण नेमकं काय आहे. थायरॉईड ही एक लहान ग्रंथी असून तिचा आकार एका  फुलपाखरासारखा असतो आणि ती गळ्याच्या खालच्या भागात स्थित असते. तिचं मुख्य कार्य म्हणजे शरीराच्या चयापचय क्रियेचं नियंत्रण ठेवणे असते.                                                      थायरॉईड आहे हे कसे ओळखावे. साधारणपणे थायरॉईडची लक्षणे पुढील प्रमाणे दिसतात. बद्धकोष्ठता (संडासला साफ होत नाही) शरीराचं वजन अचानक कमी जास्त होत राहते, हातपाय थंड पडतात, त्वचा कोरडी पांढरी पडते, तान तणाव वाढतो आळशी पणा येतो शारीरिक आणि मानसिक विकासात अडथळे, केस गळणे. थायरॉईडचे विकार होण्याची कारणे गुंतागुंतीची असू शकतात. परंतु काही पथ्य  पाळल्यास होऊ घातलेले थायरॉईड विकार टाळता येतात, त्यासाठी आहार व्यायाम आणि वैद्यकीय सल्ला महत्त्वाचा आहे. 

चौरस आहार हा थायरॉईडला दूर ठेवण्यास महत्त्वाचा ठरतो. आयोडीन, लोह, अ जीवनसत्व यांचा समावेश असलेल्या पदार्थाचे सेवन हार्मोन्सच्या उत्पादनाला चालना देते. साखर आणि पिष्टमय पदार्थाचे मर्यादित सेवन करावे. या दोन्ही पदार्थामुळे वजन वाढते. ज्यामुळे थायरॉईडच्या उत्पादनावर आणि अभिसरणावर परिणाम होतो.                              तेल- तूप- चरबी वाढविणाऱ्या पदार्थापासून दूर राहिल्याने हदयविकार, डायबिटीसह हॉर्मोन्सच्या विकारावर नियंत्रण मिळवता येतो. दररोज 30 मिनिटे व्यायाम केल्याने रक्ताभिसरण वाढते. ज्यामुळे रक्तातील थायरॉईड शरीराच्या सर्व पेशी पर्यंत पोहोचते.                                            हा आजारावर काय खावे... सफरचंद खाणे हायपोथायरॉयडिज्म समस्येत फायदेशीर मानलं जातं. कारण सफरचंदात फायबर आणि क जीवनसत्वाच प्रमाण जास्त असतं.                                                         बेरी गटातील फळ खावीत स्ट्रॉबेरी... खाण्याचा सल्ला दिला जातो बिर्याणी स्ट्रॉबेरी फळांमध्ये अँटीऑक्सिडेंट्सचं प्रमाण भरपूर असतं त्याचा फायदा थायरॉईड ग्रंथीला होतो.  संत्री खाव्यात. संत्र्यामध्ये क जीवनसत्व असतं. हाय पोथायरॉयडीजम समस्येत वजन कमी करण्यासाठी संत्री उपयुक्त ठरतात.                                              अननसात क जीवनसत्व असते. त्यामुळे अननस आवश्य खा.                                                 आहाराची पथ्य पाळल्यास थायरॉईड मध्ये वजन नियंत्रित ठेवणे शक्य होते.                                          थायरॉईडची समस्या असेल तर सोयाबीन, कोबी, ब्रोकोली, पनीर, बटर, जंक फूड, कॉपी याचे आहारातील प्रमाण कमी करा. नियमित तपासणी करून डॉक्टरांच्या सल्ल्याने आहार, औषधे घ्यावीत. एक नक्की जर आहार व्यवस्थित केला तर थायरॉईड पासून नक्की सुटका होऊ शकते.