NC Times

NC Times

सांगली जिल्हा प्लास्टिक मुक्त करण्याचा संकल्प - तृप्ती धोडमिशे जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी


नवचैतन्य टाईम्स घाटनांद्रे/वार्ताहर(जालिंदर शिंदे):-
हिंगणगाव (ता कवठेमहांकाळ) येथे प्लास्टिक संकलन मोहीमे अंतर्गत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिशे यांनी स्वतः प्रत्यक्ष प्लास्टिक संकलन मोहिमेत सहभाग घेऊन गावातील सरपंच,उपसरपंच सदस्य गावातील प्रमुख पदाधिकारी,बचत गट, जिल्हा परिषद शिक्षक,विद्यार्थी,हायस्कूल शिक्षक,पर्यावरण दूत,  आरोग्य सेविका यांच्या मदतीने गावातील सुमारे ४७ किलो प्लास्टिकचे संकलन केले.
       
या मोहिमेत जि प शाळा, परिसर दर्गा परिसर,बाजार परिसर,हायस्कूल परिसर व ग्रामपंचायतच्या आसपास ते सर्व गल्लीतील प्लास्टिक संकलन करण्यात आले.यावेळी बोलताना तृप्ती धोडमिशे यांनी ही मोहीम महिन्याच्या पहिल्या शनिवारी व तिसऱ्या शनिवारी निरंतर सुरू राहील असे सांगून,या मोहिमेअंतर्गत संपूर्ण जिल्हा प्लास्टिक मुक्त करण्याचा मानस असल्याचे स्पष्ट केले.यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीने केलेल्या माजी वसुंधरा ०.४ योजनेंतर्गत कामाचे कौतुकही केले.ग्रामपंचायतने स्थापन केलेल्या इलेक्ट्रिक चार्जिंग सेंटरसह विविध प्रकारच्या विकास कामांचीही त्यांनी पाहणी केली करुन कौतुक केले.
तसेच जलबिरादरी अंतर्गत डोंगरवडा ते अग्रणी नदीपर्यंत केलेल्या ओढा खोलीकरण कामाची प्रत्यक्ष पाहणी करून समाधान व्यक्त केले.यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किरण सायमोते,गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर,गटशिक्षणाधिकारी गोपने,उपाभियंता चांदोरे साहेब, उपअभियंता माळी साहेब,तालुका वैद्यकीय अधिकारी सतिश कोळेकर,जलबिरादरीचे अंकुश        नारायणगावकर,उद्योजक अमर सावळे,सरपंच प्रिया सावळे, उपसरपंच नितीन पाटील ग्रामसेवक विकास माने-पाटील, ग्रामपंचायत सदस्य शितल पाटील,बाजी पाटील,सिंधू लोंढे, स्वाती गुरव ,मंगल भोसले,गिरीश शेजाळ,संगीता मलमे,      योगेश चंदनशिवे,दिपाली माळी सह बहुसंख्य ग्रामस्थ,        महिला,पदाधिकारी,युवा तरुण उपस्थित होते यावेळी  प्रस्ताविक ग्रामपंचायत सदस्य गिरीश शेजाळ यांनी केले आभार उपसरपंच नितीन पाटील यांनी मांनले